एक्स्प्लोर

Shardiya Navratri 2024 : 3 ऑक्टोबरपासून सुरु होतोय शारदीय नवरात्रौत्सव; देवीच्या स्थापनेची 'अशी' करा तयारी, वाचा सामानांची यादी

Shardiya Navratri 2024 : नवरात्रीचे 9 दिवस भक्त देवीचा उपवास करतात. तिची पूजा करतात. त्यानुसार, यंदाची नवरात्र पुढच्या महिन्यापासून म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 

Shardiya Navratri 2024 : गणेशोत्सवाचा उत्सव साजरा होता होता आता नवरात्रौत्सवाचा सण जवळ आला आहे. हिंदू धर्मात नवरात्रौत्सवाला (Navratri) विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की, वर्षातून 4 वेळा नवरात्रौत्सवाचा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री, आणि 2 गुप्त नवरात्री. नवरात्रीचे 9 दिवस भक्त देवीचा उपवास करतात. तिची पूजा करतात. त्यानुसार, यंदाची नवरात्र पुढच्या महिन्यापासून म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 

नवरात्रौत्सवात देवीची पूजा, आराधना करण्यासाठी आपल्याला पूजा विधीत कोणते साहित्य लागणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

शारदीय नवरात्री कधीपासून

हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीची सुरुवात 2 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजून 18 मिनिटांनी होणार आहे. तर, या तिथीची समाप्ती 3 ऑक्टोबर रोजी रात्री 02 वाजून 58 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे, उदय तिथीनुसार, 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होईल. 

पहिल्या दिवशी होणार देवीची पूजा 

शारदीय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवी दुर्गेच्या पहिल्या रुपाची म्हणजेच देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि कलश स्थापन केल्यानंतर शैलपुत्री देवीची आराधना केली जाते. 

घटस्थापना मुहूर्त (Ghatasthapana Muhurta 2024)

नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल.

कलश स्थापनेचे साहित्य 

नवरात्रौत्सवात, कलशसह पंचपल्लव किंवा आंब्याची पाने, मातीची भांडी, पाणी, स्वच्छ कपडा, नारळ, सुपारी, गंगाजल, नाणी, दूर्वा, गहू आणि तांदूळ, हळद, पानं, कापूर इ. सामानांच्या यादीची आवश्यकता असते. 

पूजेसाठी लागणारे साहित्य (Shardiya Navratri Puja Samagri 2024)

तूप, धूप, फळ, पान, फूल, लवंग, दुर्वा, कापूर, अक्षता, सुपारी, नारळ, इलायची, लाल ओढणी, लाल वस्त्र, पान, लाल चंदन, देवीचा फोटो, दिवा, श्रृंगाराचं सामान यांसारखं साहित्य पूजेसाठी लागणार आहे. 

देवीच्या नवरात्रौत्सवात सर्व भक्त 10 दिवस एकत्र येतात. देवीचा पूजा अर्चा करतात. तिला प्रसन्न करतात तसेच तिच्यासाठी 10 दिवसांचा उपवासही करतात. या दिवासांत ठिकठिकाणी गरबा देखील खेळला जातो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shardiya Navratri 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? शारदीय नवरात्री कधीपासून? जाणून घ्या घटस्थापना मुहूर्त आणि अचूक पूजा विधी

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 August 2026 : आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
Garud Puran : सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget