Sharad Purnima 2025 : अवघ्या 24 तासांत शरद पौर्णिमेचा दिवस! चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा... देवी लक्ष्मी होईल नाराज
Sharad Purnima 2025 : यंदा 6 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजेच उद्या शरद पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. शरद पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात.

Sharad Purnima 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, धन संपत्तीची देवी लक्ष्मी (Goddess Lakshmi) शरद पौर्णिमेच्या दिवशी प्रकट झाली होती. धन संपत्तीची देवी लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाली होती. यंदा 6 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजेच उद्या शरद पौर्णिमा (Sharad Purnima) साजरी केली जाणार आहे. शरद पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात.
मान्यतेनुसार, शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी स्वत: पृथ्वीतलावर येऊन तिने भक्तांच्या सुख-समाधानासाठी आशीर्वाद दिला होता. त्यामुळे या दिवशी कोणतंही असं काम करु नका ज्याने देवी लक्ष्मी नाराज होईल. अन्यथा संपूर्ण वर्ष तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. 6 ऑक्टोबर रोजी कोणती कामे करु नयेत ते जाणून घेऊयात.
शरद पौर्णिमेला चुकूनही 'ही' कामे करु नका
संध्याकाळी केर काढणं
कधीही संध्याकाळच्या वेळी किंवा त्यानंतर केर काढू नका. कारण देवी लक्ष्मी संध्याकाळनंतरच भ्रमण करते. शरद पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी ही चूक चुकूनही करु नका, अन्यथा देवी लक्ष्मी नाराज होईल.
पांढऱ्या वस्तूंचं दान
शरद पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ, दूध, साखर कोणालाच उधार म्हणून देऊ नका किंवा घेऊ नका. कारण यापासून खीर बनवली जाते आणि चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रसादाच्या स्वरुपात तिचं सेवन केलं जातं.
पैशांची देवाण-घेवाण
शरद पौर्णिमेच्या संध्याकाळी कोणाबरोबरही पैशांची देवाण-घेवाण करु नका. कारण यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जर देवी लक्ष्मी नाराज झाली तर तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.
अन्नाचा अपमान
देवी अन्नपूर्णासुद्धा देवी लक्ष्मीचं रुप आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी अन्न वाया जाऊ देऊ नका. अन्नाचा अपमान केल्यास देवी अन्नपूर्णा नराज होऊ शकते.
मुख्य दारापाशी अस्वच्छता
देवी लक्ष्मी नेहमी मुख्य दारापाशी वास करते. त्यामुळे ही जागा नेहमी स्वच्छ ठेवा. विशेषत: या जागेवर घाण करु नका. अन्यथा देवी लक्ष्मी दारातूनच निघून जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















