Shani Vakri 2025 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शनिची वक्री चाल; 'या' 3 राशींना लागणार लॉटरी, शनि करतील मालामाल
Shani Vakri 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह, नक्षत्रांच्या स्थितीनुसार यंदाची दिवाळी फार खास असणार आहे. याचं कारण, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तब्बल 500 वर्षांनंतर शनि दिवाळीला वक्री होणार आहे.

Shani Vakri 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, यंदा 20 ऑक्टोबर 2025 दिवाळी (Diwali 2025) साजरी केली जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्री राम (Lord Ram) 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत आले होते. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह, नक्षत्रांच्या स्थितीनुसार यंदाची दिवाळी फार खास असणार आहे. याचं कारण म्हणजे, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तब्बल 500 वर्षांनंतर शनि (Shani Dev) दिवाळीला वक्री होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला कर्मफळदाता म्हणतात. शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार, फळ देतो. तसेच, शनिची वक्री चाल म्हणजेच उलटी चाल फार प्रभावशाली मानली जाते. जेव्हा शनी वक्री अवस्थेत असतात तेव्हा शनीची चाल हळुवार असते. त्यामुळे याचा प्रभाव अनेक राशींवर पाहायला मिळतो. त्यानुसार, दिवाळीच्या मुहूर्तावर होणारी शनीची वक्री स्थिती कोणकोणत्या राशींसाठी लाभदायक असणार आहे ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिची वक्री चाल लोकांच्या करिअर आणि बिझनेसवर चांगला परिणाम करणार आहे. या काळात तुम्हाला यशाची उत्तम साथ मिळेल. तसेच, तुमची रखडलेली कामे देखील तुम्ही पूर्ण करु शकता. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. कुटुंबात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. इतकंच नव्हे तर समाजात मान-प्रतिष्ठा देखील मिळणार आहे. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची ही उत्तम संधी आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनिची वक्री स्थिती या राशीच्या करिअरवर चांगला परिणाम करणारी आहे. या काळात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तसेच, वैवाहिक जीवनात गोडवा असेल. तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. कुटुंबात तुम्हाला शुभवार्ता मिळेल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न असणार आहे. जर तुम्हाला या काळात परदेशात जायचं असेल तर त्यासाठी ही चांगली संधी असेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ रास ही शनीची रास आहे. त्यामुळे शनिच्या वक्री अवस्थेत असताना या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असणार आहे. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. शनि कर्मफळदाता असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ याच काळात मिळणार आहे.















