Shani Vakri 2025 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच शनीची वक्री चाल; 'या' राशींना मिळणार मोठा झटका, होणार प्रचंड हाल
Shani Vakri 2025 : जुलै महिन्यात 13 जुलैपासून कर्मफळदाता शनी मीन राशीत वक्री चाल चालणार आहे. तब्बल 138 दिवस शनी या अवस्थेत असेल.

Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान एक मोठं ज्योतिषीय परिवर्तन होणार आहे. जुलै महिन्यात 13 जुलैपासून कर्मफळदाता शनी (Shani Dev) मीन राशीत वक्री चाल चालणार आहे. तब्बल 138 दिवस शनी (Shani Vakri) या अवस्थेत असेल. याचाच अर्थ 13 जुलै ते 28 नोव्हेंबर पर्यंत शनी मीन राशीत वक्री अवस्थेत असतील.
ज्योतिष शास्त्रात शनीला कर्मफळदाता, न्यायदेवता म्हणतात. जेव्हा शनी वक्री चाल चालतात तेव्हा त्याचा प्रभाव थेट व्यक्तीच्या विचारांवर, निर्णयक्षमतेवर आणि आयुष्यावर होतो. तसेच, या दरम्यान आर्थिक संकटांचा देखील सामना करावा लागतो. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या वक्री चालीच्या दरम्यान या राशींच्या लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या काळात विनाकारण पैसा खर्च करु नका. तसेच, कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करु नका. तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घेणं फार गरजेचं आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा सर्वात कठीण काळ असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते. तसेच, तुमच्या कार्यात तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमचं मन सतत विचलित असेल. तुमचं कोणत्याच कामात मन रमणार नाही.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असेल. तुमच्या आर्थिक स्थितीत अनेक चढ-उतार तुम्हाला पाहायला लागू शकतात. तसेच, तुमचे शत्रूदेखील तुम्हाला या काळात त्रास देतील. या कालावधीत कोणतीच महत्त्वाची जोखीम हाती घेऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी हा काळ फार संघर्षाचा असणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला फार संघर्ष करावा लागेल. तुमच्या मार्गात अनेक मोठी आव्हाने येऊ शकतात. तसेच, तुमच्या कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण होईल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांना या काळात सतर्क राहावं लागेल. तुमच्या जीवनात अस्थिरता येईल. तसेच, शनीच्या वक्री चालीचा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम झालेला दिसेल. या काळात कुठेही गुंतवणूक करु नका. तसचे, कोणाचेही सल्ले घेऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















