एक्स्प्लोर
Guru Uday 2025 : तब्बल 12 वर्षांनंतर आला सोन्याचा दिवस, गुरुचा मिथुन राशीत उदय; 'या' राशी जगतील राजासारखं जीवन
Guru Uday 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, देवगुरु ग्रह बृहस्पती हा सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानला जातो.सध्या गुरु मिथुन राशीत अस्ताच्या स्थितीत विराजमान आहे.
Guru Uday 2025
1/8

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज म्हणजेच 9 जुलै 2025 रोजी गुरु ग्रहाचा उदय झाला आहे. गुरु ग्रहाच्या उदयामुळे काही राशींना चांगलाच लाभ मिळू शकतो. यातील भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
2/8

ज्योतिष शास्त्रानुसार, देवगुरु ग्रह बृहस्पती हा सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानला जातो.सध्या गुरु मिथुन राशीत अस्ताच्या स्थिती विराजमान आहे. मात्र, आज 9 जुलै 2025 रोजी याच राशीत गुरु ग्रहाचा उदय झाला आहे.
3/8

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज पहाटे 4 वाजून 44 मिनिटांनी गुरु ग्रहाचा उदय झाला आहे. गुरु ग्रहाच्या उदयाने सर्व 12 राशींवर याचा परिणाम होणार आहे. यातील भाग्यवान राशी जाणून घेऊयात.
4/8

मिथुन राशीतच गुरुचा उदय झाल्यामुळे या राशीला चांगला लाभ मिळेल. या काळात तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होईल. तसेच, नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी तुम्ही उत्साही असाल.
5/8

मेष राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचा उदय फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या साहस आणि पराक्रमात वाढ झालेली दिसेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील.
6/8

धनु राशीसाठी आजचा दिवस फार सकारात्मक असणार आहे. या राशीच्या सप्तम चरणात गुरुचा उदय होणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे.
7/8

मीन राशीसाठी हा काळ उत्तम असणार आहे. या राशीच्या लोकांवर गुरु ग्रहाची विशेष कृपा असेल. त्यामुळे तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसणार आहे. व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 09 Jul 2025 09:15 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
नाशिक
व्यापार-उद्योग


















