Shani Vakri 2025 : 138 दिवस शनीची वक्री चाल; सोन्यासारखं लख्खं चकाकणार 'या' 3 राशींचं नशीब, तुमच्यावर असेल शनीची कृपा?
Shani Vakri 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या वक्री चालीचा अर्थ म्हणजे उलट दिशेने प्रवास करणे. या दरम्यान शनी मीनपासून ते मेष राशीवर प्रभाव टाकणार आहे. काही राशींसाठी हा काळ फार शुभ असणार आहे.

Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीची (Shani Dev) वक्री अवस्था एकूण 138 दिवसांची असते. या दरम्यान शनी उलटी चाल चालतात. शनी वक्री होऊन मेषपासून ते मीन राशीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकतात. तसेच, शनीच्या उलट्या चालीने काही भाग्यवान राशींना सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.
ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. तसेच, शनी ग्रह हळुवार गतीने भ्रमण करतात. सध्या शनी मीन राशीत संक्रमण करत आहेत. तर, 13 जुलै 2025 च्या सकाळपर्यंत म्हणजेच 7 वाजून 24 मिनिटांपर्यंत शनी वक्री होणार आहेत. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनी मार्गी होणार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या वक्री चालीचा अर्थ म्हणजे उलट दिशेने प्रवास करणे. या दरम्यान शनी मीनपासून ते मेष राशीवर प्रभाव टाकणार आहे. काही राशींसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या काळात तुमची सगळी रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, कुटुंबियांबरोबर वेळ घालवण्यासाठी तुम्हाला चांगला वेळ मिळेल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री अवस्था फार लाभदायक ठरणार आहे. तसेच, भावा-बहिणींबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. मित्रांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. कामाच्या दरम्यान उत्पन्नाच्या तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. तसेच, तुम्ही कोणताही निर्णय घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल फार लाभदायक ठरणार आहे. या काळात अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. देवी लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद लाभेल. तसेच, कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील तुमची कामे पूर्ण होतील. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. तसेच, तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















