Shani Vakri 2024 : जून महिन्यात 'या' राशींना भोवणार शनीची साडेसाती; करावा लागणार अनेक संकटांचा सामना
Shani Vakri 2024 : शनी लवकरच आपली चाल बदलणार आहे. याचा काही राशींवर परिणाम होणार आहे.
Shani Vakri 2024 : ज्योतिष शास्त्रात शनीच्या वक्री (Shani Dev) चालीला फार महत्त्व आहे. त्यानुसार शनी (Lord Shani) पुन्हा एकदा आपली वक्री चाल खेळणार आहे. पंचांगानुसार, शनी 29 जून रोजी वक्री चाल चालणार आहे. शनीची ही वक्री चाल काही राशींसाठी (Zodiac Signs) फार आव्हानात्मक असणार आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, 15 नोव्हेंबरपर्यंत शनीची ही वक्री चाल असणार आहे. 135 दिवसांपर्यंत शनी आपली उलटी चाल चालणार आहेत.
'या' 4 राशींवर असणार शनीची उलटी चाल
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल फार आव्हानात्मक असणार आहे. या दरम्यान तुम्ही कोणतेही हाती घेतलेलं काम सावधानतेनं करण्याची गरज आहे.तसेच, या काळात तुम्हाला अनेक आव्हानं येतील. त्यामुळे तुमचं मानसिकरित्या खच्चीकरण होईल. त्यामुळे या काळात तुमच्या आरोग्याबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नका. तुमच्या तब्येतीबाबत तुम्ही सतर्क राहा.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीच्या वक्री चालीचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांना देखील होणार आहे. या काळात तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच,बिझनेस आणि करिअरशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहा. तुमचा एकही चुकीचा निर्णय तुम्हाला महागात पडू शकतो.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांनी शनीच्या वक्री चालीच्या दरम्यान सतर्क राहण्याची गरज आहे. या काळात तुमच्या संकटांत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुमच्या हातून अशुभ कार्य होण्याची देखील शक्यता आहे. तुम्हाला पैशांची आर्थिक चणचण भासू शकते. त्यामुळे तुम्हाला अधिक सावधान राहण्याची गरज आहे. यासाठी या काळात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनी आपल्याच राशीत म्हणजे कुंभ राशीत उलटी चाल चालणार आहेत. कुंभ राशीच्या लोकांना याचे नकारात्मक परिणाम सहन करावे लागू शकतात. तुम्ही जर जॉब करत असाल तर या काळात तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तुमच्यासमोर अनेक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होतील. पण या काळात खचून जाऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :