Horoscope Today 5 June 2024 : मिथुन, सिंहसह 'या' राशींना सावध राहण्याची गरज; इतर राशींचा आजचा दिवस कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 5 June 2024 : आजचा तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 5 June 2024 : पंचांगानुसार, आज 5 जून 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
उत्तम कल्पनाशक्तीमुळे कवी कलाकार आणि लेखक यांच्या हातून चांगले साहित्य निर्माण होईल. महिलांना कामाच्या बाबतीत तारेवरची कसरत करावी लागेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
एखाद्या कामातील सखोल चिंतनामुळे कामाचा दर्जा सुधारेल. जवळच्या लोकांना आवश्यक ती मदत करण्याची वृत्ती राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
तुमचा कोणी गैरफायदा घेत नाही ना याकडे आज लक्ष द्या प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
वेगवेगळ्या क्षेत्रातील कारागिरांच्या नवीन कल्पनांना पोषक वातावरण मिळेल. महिलांना खरेदीचा मूड राहील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
आज जरा स्वतःबद्दल शांत बसून विचार करणे गरजेचे राहील. महिलांची चार चव्हाण पेक्षा काहीतरी वेगळे करण्याची वृत्ती वाढेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
नोकरी व्यवसायात आपण जे काम करतो त्या कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक ठरेल. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे ठरेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
अति महत्वकांक्षामुळे कामात अडथळे येऊ शकतात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यायला लागेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
काहीतरी जगावेगळे करायला जाल परंतु त्या अंगलट येत नाही ना याची काळजी घ्या.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धार्मिक किंवा सामाजिक कार्यात नाविन्यपूर्ण गोष्टी कराल. विद्यार्थी आवडत्या क्षेत्रात रमतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
घरामध्ये ज्येष्ठ आणि तरुण दोन्ही वर्गांची ये जा वाढणार आहे. त्यामुळे जुने आणि नवीन विचारांची साथ तुम्हाला द्यावी लागेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
घरातील अनेक कामांच्या मदतीसाठी जोडीदाराचे सहकार्य मिळवावे लागेल. एखादे काम लवकर पूर्ण होण्यासाठी वेगळी पद्धत अवलंबा.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज बोलण्यापेक्षा मौन पाळणे फायद्याचे ठरेल. स्वतःची कामे स्वतः करावीत.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: