एक्स्प्लोर

Shani Vakri 2024 : शनिच्या वक्री काळात अजिबात करू नये 'ही' कामं; बेफिकीर राहणाऱ्यांना बसतो मोठा फटका

Shani Vakri 2024 : जेव्हा शनि वक्री स्थितीत असेल तेव्हा असं कोणतंही काम करू नये, ज्याचे भोग नंतर तुम्हाला भोगावे लागू शकतात. शनि वक्री काळात कोणत्या गोष्टी केल्याने अडचणी वाढतात? जाणून घेऊया.

Shani Vakri 2024 : सूर्य पुत्र शनि महाराजांच्या कृपेने एखाद्या व्यक्तीचं भाग्य उजळू शकतं. पण जेव्हा शनि (Shani) नाराज होतो, तेव्हा राजालाही कंगाल व्हायला वेळ लागत नाही. मात्र, शनिदेव केवळ चूक करणाऱ्यांनाच शिक्षा देतात.

यासोबतच, शनीचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे शनीच्या हालचालीवर अवलंबून आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे, जो एकाच राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो.

शनि वक्री कधीपासून कधीपर्यंत? (Saturn retrograde 2024)

सध्या शनि कुंभ राशीत वक्री स्थितीत आहेत. कुंभ ही शनिदेवाची मूळ राशी आहे. 29 जून 2024 रोजी शनि कुंभ राशीत वक्री झाला आणि 15 नोव्हेंबरनंतर शनि सरळ चालीत मार्गी होईल. शनीची वक्री स्थिती ज्योतिषशास्त्रात शुभ मानली जात नाही.

वक्री स्थितीतील शनि अनेक लोकांसाठी त्रासदायक ठरतो. विशेषत: जे लोक शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली असतात आणि जे लोक चुकीची कामं करतात, त्यांना या काळात शनिदेव शिक्षा देतात. त्यामुळे या काळात असं कोणतंही काम करू नये, ज्यामुळे तुम्हाला शनिदेवाच्या नाराजीला सामोरं जावं लागेल. शनीची वक्रदृष्टी असताना नेमकी कोणती कामं करू नये? जाणून घेऊया .

शनि वक्री असताना कोणती कामं करू नये?

  • जे लोक आधीच शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली आहेत, त्यांनी शनीच्या वक्री काळात कोणताही नवीन व्यवसाय किंवा कुठलंही शुभ काम सुरू करू नये. कारण शनिदेवाच्या उलट ऊर्जेमुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळण्याची शक्यता कमी आहे.
  • शनिदेव वक्री काळात लोकांची परीक्षा घेत असतात, त्यामुळे यावेळी आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडा आणि चोरीसारखी चुकीची कामं करू नका.
  • न्यायाचा देव शनि जेव्हा उलट फिरत असतो, तेव्हा लोकांनी सर्व प्रकराच्या लोभापासून दूर राहावं. शनिदेव लोभी लोकांवर कोपतात आणि त्यांना कठोर शिक्षा देतात.
  • शनीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी वृद्ध, महिला, गरीब, मजूर, जनावरं यांना त्रास देऊ नये. या काळात त्यांना वेदना किंवा त्रास होईल असं काहीही करू नका, अन्यथा शनीचा प्रकोप होतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Dev : अवघ्या 3 दिवसांत शनी बदलणार चाल! 'या' 3 राशींच्या इच्छा होणार पूर्ण; अनेक कामं लागतील मार्गी        

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवाला दाखवलेला नारळ खराब निघाला तर शुभ की अशुभ? धार्मिक महत्त्व, मान्यता काय सांगते? जाणून थक्क व्हाल...
देवाला दाखवलेला नारळ खराब निघाला तर शुभ की अशुभ? धार्मिक महत्त्व, मान्यता काय सांगते? जाणून थक्क व्हाल...
Somvati Amavasya 2026: आज सोमवती अमावस्या, 5 राशींचं भाग्य फळफळलं! सौभाग्य योगाचा पॉवरफुल संयोग, काय करावे? काय करू नये? ज्योतिषशास्त्र...
आज सोमवती अमावस्या, 5 राशींचं भाग्य फळफळलं! सौभाग्य योगाचा पॉवरफुल संयोग, काय करावे? काय करू नये? ज्योतिषशास्त्र...
Diwali Padwa 2026: उद्या बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा! पतीचं औक्षण करण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! धार्मिक महत्त्व, परंपरा, पूजाविधी जाणून घ्या...
उद्या बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा! पतीचं औक्षण करण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! धार्मिक महत्त्व, परंपरा, पूजाविधी जाणून घ्या...
Horoscope Today 9 November 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी खिशाला लागणार कात्री, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी खिशाला लागणार कात्री, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Gokul Kolhapur Dasara Chowk Morcha: गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Gokul Election 2026: सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
Embed widget