(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani : तब्बल 30 वर्षांनंतर शनि आणि सूर्य एकाच राशीत; एक महिन्यापर्यंत 'या' राशींना मिळणार लाभच लाभ, पालटणार नशीब
Shani-Surya Transit : सुर्याने 13 फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश केला. सुर्याच्या राशी बदलामुळे कुंभ राशीत शनि-सुर्य एकत्र आले आहेत, या दोन ग्रहांचा हा योग काही राशींसाठी फलदायी ठरणार आहे.
Shani 2024 : सध्या शनिदेव (Shani Dev) कुंभ राशीत विराजमान आहेत, जिथे आता सुर्याची पण एन्ट्री झाली आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, जवळपास 30 वर्षांनंतर पिता-पुत्रांची युती कुंभ राशीत झाली आहे. 13 फेब्रुवारीला सुर्याने कुंभ राशीत प्रवेश केला. सुर्याच्या राशी परिवर्तनामुळे शनि-सूर्य युतीची निर्मिती झाली, या दोन ग्रहांची झालेली ही युती 13 मार्चपर्यंत राहणार आहे.
बऱ्याच वर्षांनंतर शनि-सूर्य (Shani-Surya Transit) एकत्र आल्याने काही राशींना याचा बराच फायदा होणार आहे, तुमचं नशीब या काळात चांगलं वळण घेईल. नेमक्या कोणत्या राशींसाठी हा एक महिन्याचा काळ लाभदायी ठरणार आहे ते जाणून घेऊया.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी शनि-सुर्याची युती लाभदायी ठरू शकते. या काळात तुमचं जीवन चांगल्या वळणावर येईल, वैवाहिक जीवनातील वाद मिटतील. व्यवसाय करत असलेल्या लोकांना या काळात एक चांगला गुंतवणूकदार मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळतील. या महिनाभरात तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवासाला जाऊ शकता. 13 मार्चपर्यंतच्या काळात तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते, या काळात तुमच्या कुटुंबात सुख-शांति नांदेल.
मिथुन रास (Gemini)
जवळपास 30 वर्षांनंतर बनलेली शनि-सुर्याची युती मिथुन राशीच्या लोकांसाठी फार फायदेशीर ठरू शकते. नोकरीत बढती मिळवण्यासाठी तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपावल्या जातील, ज्या तुम्ही वेळेत पूर्ण केल्या पाहिजे. सिंगल लोकांच्या आयुष्यात या काळात एखाद्या खास व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते. महिन्याभराच्या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि आत्मविश्वासाने तुम्ही प्रत्येक काम जबाबदारीने पूर्ण कराल. तुमच्या कुटुंबियांकडून तुम्हाला वेळोवेळी मदत मिळेल.
मकर रास (Capricorn)
शनि-सुर्याची युती मकर राशीच्या लोकांसाठी देखील शुभ ठरेल. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होत राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, हा महिनाभर अभ्यासात तुमचं मन रमेल. परंतु या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असेल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :