Shani Sade Sati 2026 : नवीन वर्षात 'या' 3 राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट; लाभ मिळणार की आर्थिक संकट ओढावणार?
Shani Sade Sati 2026 : नवीन वर्ष 2026 मध्ये सुद्धा शनी याच राशीत स्थित असणार आहेत. या दरम्यान शनी आपलं नक्षत्र देखील बदलणार आहे. यामुळे काही राशींच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडून येतील.

Shani Sade Sati 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला (Shani Dev) कर्मफळदाता तसेच, न्यायदेवता म्हणतात. शनी ज्या राशीत संक्रमण करतात त्या राशीवर दीर्घ काळापर्यंत प्रभाव टाकतात. सध्या शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. ही रास बृहस्पतीची आहे. विशेष म्हणजे, नवीन वर्ष 2026 मध्ये सुद्धा शनी याच राशीत स्थित असणार आहेत. या दरम्यान शनी आपलं नक्षत्र देखील बदलणार आहे. यामुळे काही राशींच्या (Zodiac Signs) जीवनात महत्त्वाचे बदल घडून येतील.
ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026 च्या सुरुवातीला शनी जवळपास तीन आठवड्यापर्यंत पूर्वा भाद्रपद नक्षत्रात असणार आहे. त्यानंतर उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्रात शनिचा प्रवेश होणार आहे. सध्या याचा स्वामी ग्रह बृहस्पती गुरु ग्रह मिथुन, कर्क आणि सिंह राशींतून जाणार आहे. शनिच्या साडेसातीचा प्रभाव सर्वात जास्त मेष, कुंभ आणि मीन राशींवर दिसणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी 2026 चं नवीन वर्ष मेहनत आणि धैर्याचा परिणाम घेऊन येणार आहे. मागच्या काही वर्षांत जो धडा या राशीने शिकला आहे तो म्हणजे संयम, लक्ष केंद्रित करणं आणि परिस्थितीचा स्वीकार करणं हे तुमच्या कामी येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. पण, तुम्ही तुमच्या मुळाशी असणं गरजेचं आहे.
तुमच्या आर्थिक स्थितीत स्थिरता येईल. तसेच, जे जुने तणवा आहेत ते हळूहळु दूर होतील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तुमच्या जीवनात चांगले बदल घडून येतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे नवीन वर्ष चांगला बदल घडून येणार आहे. शनि आपल्या राशीत मोठा बदल करणार आहे. तुमच्या कामात आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील.
तसेच, अनेक आव्हानांचा तुम्ही स्वीकार कराल. मात्र, हा बदल तुम्हाला आणखी परिपूर्ण आणि मजबूत करेल.
तसेच, नवीन वर्षात तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. या काळात तुम्हाला दीर्घ काळापर्यंत धैर्य टिकून राहील. नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. हा काळ तुमच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा संबंध आत्मनिरीक्षण आणि जबाबदारीशी जोडण्यात आला आहे. या काळात तुम्हाला तुमचं ध्येय, विचार आणि तुमच्या तत्वांशी जोडून राहायचं आहे. तसेच, सुरुवातीच्या काळात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. मात्र, हळुहळू तुमची परिस्थिती नियंत्रणात राहील.
2026 चं नवीन वर्ष शनीच्या प्रभावाने जबाबदारीचं असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला तुमचं अभ्यासात मन रमेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :















