Gajkesari Yog 2025 : आज जुळून आला महाशक्तिशाली 'गजकेसरी योग'; 'या' 3 राशींची गाडी चालणार सुस्साट वेगाने, करिअरला आता 'No Break'
Gajkesari Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, गजकेसरी योग फार शक्तिशाली योग मानला जातो. हा शुभ योग तीन राशींसाठी करिअर, आर्थिक स्थिती आणि आरोग्यासाठी लाभदायी ठरणार आहे.

Gajkesari Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 12 ऑक्टोबर 2025 चा दिवस आहे. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस फार खास असणार आहे. कारण आजच्या दिवशी गुरु आणि चंद्र ग्रह मिळून गजकेसरी योग (Gajkesari Yog) निर्माण केला आहे. आज चंद्राने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. या ठिकाणी गुरु ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळेच मिथुन (Gemini) राशीत गुरु-चंद्र ग्रहामुळे गजकेसरी योग निर्माण झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हा फार शक्तिशाली योग मानला जातो. हा शुभ योग तीन राशींसाठी करिअर, आर्थिक स्थिती आणि आरोग्यासाठी लाभदायी ठरणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
गजकेसरी योग मिथुन राशीसाठी फार कल्याणकारी ठरणार आहे. या दिवशी दान धर्म केल्यास त्याचं पुण्य फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील संकटं दूर होतील. तसेच, पैसे बचतीचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील. त्याचा परिणाम तुमच्या बॅंक बॅलेन्सवर देखील होणार आहे. तसेच, घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या मनातील जळमटं दूर होतील. प्रेमभावना निर्माण होऊन सर्वांशी सलोख्याने वागाल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी निर्माण झालेला गजकेसरी योग फार लाभदायी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाणार आहे. तसेच, जुन्या मित्रांशी भेटीगाठी होतील. व्यवसायात तुम्हाला अपार धनलाभ होईल. तसेच, समाजात तुमची पद-प्रतिष्ठा टिकून राहील. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या हातात पैसा खेळेल. मात्र, याचा जपून वापर करा. अन्यथा लक्ष्मी नाराज होईल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा गजकेसरी योग फार आनंदाचा ठरणार आहे. आजच्या दिवसात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, नोकरीत लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. लग्नाचे नवीन प्रस्ताव येऊ शकतात. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :















