Shani Dev : नवीन वर्षात शनिदेव ठेवतील 'या' पाच राशींवर लक्ष, तुमच्या राशीचा यात समावेश आहे का?
Shani Rashi Parivartan January 2023: 17 जानेवारी 2023 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनीच्या आगमनामुळे अनेक राशींच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात.
Shani Rashi Parivartan January 2023 : नवीन वर्ष 2023 (New Year 2023) सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षात शनि परिवर्तनामुळे (Shani Dev) विविध ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत बदल होणार आहेत. सध्या शनिदेव मकर राशीत भ्रमण करत आहेत. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करतील. कुंभ राशीत शनीच्या आगमनाचा थेट परिणाम पाच राशींवर होईल. शनि संक्रमण तीन राशींवर आणि शनि ढैय्याचा दोन राशींवर परिणाम होणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी नवीन वर्ष कसे जाणार?
ज्योतिषशास्त्रात शनिला विशेष स्थान
ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष स्थान आहे. तो ग्रहांचा राजा सूर्याचा पुत्र आहे, पण हे दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत. शनीला न्यायाची देवता म्हणतात. ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनिदेवाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर होत असला तरी काही राशींवर मात्र शनीची साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव सुरू होतो. पंचांगानुसार 17 जानेवारी 2023 रोजी रात्री 8:02 वाजता शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतील.
हे तीन प्रमुख ग्रह शनीच्या अनुराधा नक्षत्रात आहेत, या राशींना धनसंपत्ती मिळण्याची दाट शक्यता आहे.
मीन- मीन राशीत शनीच्या परिवर्तनामुळे शनी साडेसातीच्या पहिल्या चरणाची सुरुवात होईल. या साडेसातीचे तीन टप्पे असतील. शनिदेव प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी फळे देतात. असे म्हटले जाते की, पहिल्या चरणात शनिदेव अधिक त्रासदायक ठरतात.
कुंभ - कुंभ राशीत लोकांवर शनीच्या परिवर्तनामुळे शनीची साडेसाती दुसरी अवस्था होईल. कुंभ राशीतच शनि परिवर्तन करणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनि ग्रह आहे. ज्योतिषांच्या मते, शनीच्या अशुभ स्थितीचा कुंभ राशीच्या लोकांवर कमी प्रभाव पडतो. मात्र, कुंभ राशीच्या लोकांना साडेसाती वेळी चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते.
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू होईल. अशा स्थितीत अडीच वर्षानंतर मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. शनीची राशी अडीच वर्षांनी बदलते. मकर राशीच्या लोकांना या काळात आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
कर्क - 17 जानेवारी 2023 पासून कर्क राशींवर शनिची ढैय्या सुरू होईल. शनि ढैय्यामुळे कर्क राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. या काळात पैशाच्या बाबतीत सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांवर देखील कर्क राशीप्रमाणे शनि ढैय्याचा प्रभाव राहील. या काळात वाणीवर संयम ठेवा. वादविवादापासून दूर राहा. पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या