Shani Margi 2025 : तब्बल 30 वर्षांनंतर गुरुच्या राशीत शनीची होणार एन्ट्री; 'या' राशींचा कारभार चालणार सुस्साट, 'अच्छे दिन' लवकरच
Shani Margi 2025 : शनी जुलै महिन्यात वक्री होऊन वर्षाच्या शेवटी मार्गी चाल चालणार आहेत. त्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरु होतील.

Shani Margi 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनिदेव (Shani Dev) एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी जवळपास 30 वर्षांनंतर प्रवेश करतो. नुकतंच, 29 मार्च रोजी शनीने (Lord Shani) कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रेवश केला. मीन राशीचा गुरु ग्रह हा अधिपत्य ग्रह आहे. शनी आणि गुरु ग्रहात मैत्रीचं नातं आहे. शनी जुलै महिन्यात वक्री होऊन वर्षाच्या शेवटी मार्गी चाल चालणार आहेत. त्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरु होतील. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी शनीचं मार्गी होणं लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या कर्म भावात शनी देव मार्गी होणार आहेत. त्यामुळे तुमच्या कामकाजात चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. व्यवसायात नफा मिळेल. तसेच, सरकारी नोकरीचा तुम्ही चांगला लाभ घेऊ शकाल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी शनीची सरळ चाल फार अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या चतुर्थ भावात शनी मार्गी होणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ सुख-शांतीचा असणार आहे. या काळात तुम्ही पैशांची देवाण-घेवाण करु शकता. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावारण निर्माण होईल. तुम्ही पैशांची बचतही करु शकता. तसेच, तुमच्या व्यवसायात प्रगती झालेली दिसेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचं मार्गी होणं फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या उत्पन्न भावात शनी विराजमान असणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच, उत्पन्नाचे नवे स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत राहील. जर तुम्हाला नवीन घर किंवा वाहन, प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभ असणार आहे.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















