एक्स्प्लोर

Shani Jayanti 2024 Upay : शनीची साडेसाती आणि पिडा होईल दूर; आज शनि जयंतीला करा 'हा' सोपा उपाय, आजन्म नांदेल सुख-शांती

Shani Jayanti 2024 Upay : यंदा शनि जयंती 8 मे रोजी आली आहे. हा दिवस शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपयुक्त मानला जातो, या दिवशी तुम्ही काही उपाय केल्यास तुमच्यावर शनिदेव प्रसन्न होऊ शकतात. तुमच्या सर्व समस्या शनिदेव दूर करू शकतात.

Shani Jayanti 2024 Upay : आज शनि जयंती. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनि व्यक्तीला कर्माच्या आधारे फळ देतो, म्हणून शनीला (Shani) न्याय देवता म्हटलं जातं. कुंडलीतील शनीच्या स्थितीचा परिणाम हा व्यक्तीच्या जीवनावर नेहमी होत असतो. यंदा 8 मे रोजी शनि जयंती (Shani Jayanti 2024) आली आहे.  हा दिवस शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी खास आहे.

आपल्यावर सतत येणारी संकटं कमी करण्यासाठी, तसेच साडेसाती दूर करण्यासाठी या दिवशी शनिदेवाची विधीवत पूजा केली जाते. तसेच, शनीची पिडा दूर करण्यासाठी शनि जयंतीच्या दिवशी काही खास उपाय (Shani Jayanti 2024 Remedies) केले जातात.

शनि जयंतीच्या दिवशी करा हे उपाय (Shani Jayanti 2024 Upay)

तिळाच्या तेलाचे किंवा मोहरीच्या तेलाचे दिवे लावा

शनि जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली 5 तिळाच्या तेलाचे किंवा मोहरीच्या तेलाचे दिवे लावावेत आणि हात जोडून सात परिक्रमा कराव्या.

हनुमान मंदिरातही दिवे लावा

शनीच्या साडेसातीने प्रभावित झालेल्या व्यक्तींनी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचं पठण करावं. असं केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनात चालू असलेल्या समस्यांपासून आराम मिळतो, सर्व समस्या दूर होतात.

या उपायाने मिळेल शनिदोषापासून मुक्ती

शनि जयंतीच्या दिवशी संध्याकाळी एक नारळ घेऊन ते सात वेळा स्वतःवरुन फिरवा आणि मग तो वाहत्या पाण्यात सोडा. यासोबतच काळी उडीद बारीक करून पिठाचे गोळे बनवून संध्याकाळी माशांना खायला द्या, असं केल्याने शनीची पिडा दूर होते. हळूहळू सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

सौभाग्य वाढीसाठी हे उपाय उपयुक्त

सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करा. यानंतर शनि स्तोत्र आणि शनि चालीसा पठण करा आणि गरीब आणि गरजू लोकांना काहीतरी दान करा. असं केल्याने शनिदेवाची कृपा राहील आणि कुटुंबातील सदस्यांचीही प्रगती होईल.

सावली दान करा

जर तुम्हाला शनि जयंतीला सकाळी सावली दान करता येत नसेल तर संध्याकाळीही करू शकता. यासाठी पितळेच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात मोहरीचं तेल घ्या आणि त्यात एक नाणं टाका. त्यानंतर त्यात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ते तेल वाटीसोबत शनि मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला द्या. असं केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील आणि शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल.

काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला

जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनि जयंतीच्या संध्याकाळी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलातील चपाती किंवा भाकरी खाऊ घाला. असं केल्याने शनिदोष दूर होतो आणि जर तुमच्या जीवनात कोणतंही मोठं संकट येणार असेल तर तेही दूर होतं. काळ्या कुत्र्याला भाकरी दिल्याने शनि आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 'या' चुका कराल तर श्रीमंत होण्याची स्वप्नं सोडाच; येईल अठरा विश्वे दारिद्र्य

Shani Jayanti 2024 : आज शनि जयंती; जीवनातील सर्व दु:ख दूर करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा, संध्याकाळी 'या' वेळेवर करा शनीची पूजा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Police Custody : कराड गजाआड! पोलीस कोठडीनंतर वाल्मिकच्या वकिलांची मोठी प्रतिक्रियाWelcome 2025 : वेलकम 2025, नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत, उत्साह शिगेलाRajikya Shole Special Report Walmik Karad : वाल्मिक कराड शरण, A टू Z घटनाक्रम काय?Rajikya Shole Special Report on Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती, विरोधकांचा संशय कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
Embed widget