Astrology : तब्बल 50 वर्षांनंतर जुळून आला त्रिग्रही योग; 3 राशी जगणार राजासारखं जीवन, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Trigrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिषानुसार, मीन राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. ज्यामुळे 3 राशींच्या लोकांचं भाग्य उजळेल. या राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि त्यांच्या सुख-संपत्तीत वाढ होईल.
Trigrahi Yog 2025 In Pisces : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक वेळेनंतर भ्रमण करतात, राशी बदलतात आणि विविध योग, राजयोग तयार करतात. या योगांचा परिणाम मानवी जीवनासह देश आणि जगावर दिसून येतो. अशातच आता मार्चमध्ये त्रिग्रही योग (Trigrahi Yog) तयार होणार आहे. मीन राशीत सूर्य, बुध आणि शनि एकत्र येणार आहेत. या 3 ग्रहांच्या संयोगाने त्रिग्रही योग निर्माण होईल. नवीन वर्षात तयात होत असलेला त्रिग्रही योग 3 राशींसाठी भाग्याचा ठरेल. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Pisces)
त्रिग्रही योग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण तुमच्या कुंडलीच्या करिअर आणि बिझनेसच्या जागी हा योग तयार होत आहे. त्यामुळे या काळात बेरोजगारांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात. तसेच, नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकतं, त्यांच्या पदात वाढ होऊ शकते. तसेच, यावेळी तुम्हाला कामावर काही नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना अनेक नवीन डील मिळू शकतात, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वेगाने प्रगती करेल. याशिवाय वडिलोपार्जित संपत्तीचाही लाभ मिळू शकतो.
धनु रास (Pisces)
धनु राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीतून चौथ्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. तसेच आर्थिक दृष्टीकोनातून हा काळ शुभ राहील. तुम्ही धार्मिक कार्यात गुंतलेले राहाल. तुमचा आत्मनिरीक्षण आणि ध्यानाकडे कल असेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. या काळात तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तसेच, या काळात तुमचे तुमच्या आईसोबतचे नाते घट्ट होईल.
मीन रास (Pisces)
त्रिग्रही योग तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. कारण तुमच्या राशीच्या चढत्या घरावर या योगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारेल. तसेच समाजात तुमची प्रतिष्ठा वाढून तुमची सकारात्मक प्रतिमा निर्माण होईल. तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी कारणी लावा आणि इतरांच्या भावनांचा आदर करा. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात शांतता राहील. यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: