Shani Gochar 2025 : शनीचा होतोय मीन राशीत प्रवेश; 2025 च्या सुरुवातीलाच 3 राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार
Shani Gochar 2025 : द्रिक पंचांगानुसार, 29 मार्च 2025 रोजी कर्मफळदाता शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, 3 जून 2027 पर्यंत शनी याच राशीत असणार आहे.
Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) न्यायदेवता आणि कर्मफळदाता म्हणतात. शनी (Lord Shani) हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीची एखाद्या राशीवर वाईट नजर असली तर त्याचा परिणाम अधिक काळापर्यंत राहतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. नवीन वर्षात शनी गुरुच्या राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे.
द्रिक पंचांगानुसार, 29 मार्च 2025 रोजी कर्मफळदाता शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, 3 जून 2027 पर्यंत शनी याच राशीत असणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर शुभ-अशुभ परिणाम होतो. पण, 3 राशी अशा आहेत त्यांना शनीच्या संक्रमणाचा लाभ मिळणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीचं राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना या काळात खूप लाभ मिळणार आहे. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात देखील चांगला लाभ मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीच्या राशी परिवर्तनाचा काळ फार चांगला असणार आहे. शनी या राशीच्या दशम चरणात असल्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तुम्हाला चांगल्या प्रमोशनची देखील संधी मिळू शकते. तसेच, तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. व्यापारात नवीन योजनांचा लाभ घेता येईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनीच्या राशी परिवर्तनाचा काळ फार भाग्यशाली असणार आहे. शनी तिसऱ्या चरणात असल्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. शनीच्या साडेसातीपासून तुम्ही मुक्त व्हाल. तसेच, तुमचे गेलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळेल. तुमची रखडलेली सर्व कामे या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :