Shani Gochar 2025 : जून महिन्यात 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; शनी नक्षत्र परिवर्तनामुळे लवकरच सुरु होणार 'अच्छे दिन'
Shani Gochar 2025 : जून महिन्यात होणाऱ्या शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा अनेक राशींवर परिणाम होणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल.

Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, दंडनायक शनी (Shani Dev) एका ठराविक काळानंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. जेव्हा शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात तेव्हा तो काळ अडीच वर्षांचा असतो. तर, शनी जवळपास एक वर्षाने नक्षत्र परिवर्तन करतात. तसेच, एका राशीत पुन्हा येण्यासाठी जवळपास 27 वर्षांचा कालावधी लागतो. या दरम्यान शनी नक्षत्र परिवर्तन करणार आहे.
जून महिन्यात होणाऱ्या शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा अनेक राशींवर परिणाम होणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. या भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
कर्मफळदाता शनी 28 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर, 7 जून रोजी संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी उत्तरा भाद्रपदाच्या द्वितीय चरणात प्रवेश करणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनी देवाचा उत्तरा भाद्रपदमध्ये प्रवेश होऊन या राशीच्या दहाव्या चरणात प्रवेश करणार आहे. या राशीच्या कर्म भावात शनी असणरा आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना कामकाजात चांगलं यश मिळेल. उच्च अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसे, तुमची रखडेलेली कामे पूर्ण करता येतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या सप्तम भावात असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसेल. तसेच, जर या दरम्यान तुम्हाला बॅंकेतून लोन जरी काढायचा असेल तरी तो सहज मिळून जाईल. या व्यतिरिक्त तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला पूर्ण करता येतील. घरातील वातावरण फार प्रसन्न राहील. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. फक्त धैर्याने काम करा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
या राशीच्या दुसऱ्या चरणात शनि विराजमान असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. या कालावधीत तुमच्या कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, परदेशात जाण्याची संधी चालून येईल. या काळात तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. तुमचं आरोग्य चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















