(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : 'या' राशींवर शनिची असेल वक्रदृष्टी! प्रत्येक कामात अपयश आणि संकटांचा करावा लागणार सामना
Shani Dev : शनीची साडेसाती आणि ढैय्या खूप वेदनादायक असतात. ज्यांच्याकडे शनिचा हा दोष आहे त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनि (Shani Dev) हा न्यायाचा ग्रह मानला जातो. हा कर्मकारक ग्रह आहे. शनी (Lord Shani) सध्या स्वतःच्या कुंभ राशीत आहे. काही राशींना या वर्षभरात शनीची साडेसाती आणि ढैय्या असणार आहेत. यासाठीच शनिमुळे कोणत्या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक अडचणी येतील आणि यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
या राशींवर शनि भारी
2024 मध्ये शनिच्या राशीत कोणताही बदल होणार नाही. या संपूर्ण वर्षात शनि कुंभ राशीत असल्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीचा त्रास राहील. तसेच, कर्क आणि वृश्चिक राशीचे लोक या वर्षभरात शनिच्या प्रभावाने त्रस्त राहतील. 2025 मध्ये शनि आपली राशी बदलणार आहे. या सर्व राशींवर शनि वर्षभर जड राहील. या राशीच्या लोकांना शनीच्या अशुभ प्रभावाचा सामना करावा लागू शकतो. शनीची साडेसाती आणि ढैय्या दरम्यान काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
साडेसाती आणि ढैय्या या गोष्टी लक्षात ठेवा
- ज्या लोकांवर शनिची साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव आहे त्यांनी कोणतेही काम अत्यंत सावधगिरीने करावे. जोखमीचे काम करणे टाळावे. घरात किंवा कामाच्या ठिकाणी विनाकारण कोणाशीही वाद घालू नका.
- साडेसाती आणि ढैय्या असतील तर वाहन चालवताना नेहमी सावध राहावे. रात्री एकट्याने प्रवास करू नये.
- खोटे बोलणे, फसवणूक करणे, चोरी करणे, इतरांना त्रास देणे आणि कोणतेही अनैतिक काम करणे टाळावे. राग आणि लोभावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
- ज्यांच्यावर शनि सती आहे अशा लोकांनी शनिवार आणि मंगळवारी मांसाहार आणि दारूपासून दूर राहावे. या दोन्ही दिवशी काळे कपडे किंवा चामड्याच्या वस्तू खरेदी करू नयेत.
शनिचे उपाय
- साडेसातीच्या काळात शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय करावेत. दर शनिवारी शनिदेवाची पूजा करणे चांगले मानले जाते. ज्योतिष शास्त्राचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही ब्लू सेफायर रत्न घालू शकता. यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो.
- शनीच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी दररोज हनुमान चालीसा वाचा. शनिवारी आणि मंगळवारी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा आणि कपडे दान करा. ज्यांना साडेसाती आहे त्यांनी दररोज शनि स्तोत्राचे पठण करावे.
- गरीब, असहाय्य आणि प्राण्यांची सेवा केल्याने पुण्य मिळते आणि शनिदेव प्रसन्न होतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्यान करणे देखील शनिदेवाला प्रसन्न करण्याचा एक चांगला मार्ग आहे. शनिवारी काळे वस्त्र आणि तेल दान केल्याने साडेसातीपासून आराम मिळतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :