Shani Dev : पुढचे 139 दिवस शनिची वक्री चाल! या राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ; सुख-शांतीबरोबरच होतील मालामाल
Shani Dev : शनिच्या राशी परिवर्तनाने काही राशींवर साडेसाती देखील लागते. तर, काही राशींसाठी शनिचे उलट गतीने होणारे संक्रमण काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकते.
Shani Dev : शनिला न्यायदेवता (Lord Shani) आणि कर्मफळदाता मानले आहे. ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांच्या तुलनेने शनिची (Shani Dev) चाल सर्वात संथ गतीने आहे. शनिने जर एखाद्या राशीत प्रवेश केला तर पुढचे अडीच वर्ष तो त्याच राशीत असतो. त्यामुळेच शनिच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर परिणाम होतो. शनिच्या राशी परिवर्तनाने काही राशींवर साडेसाती देखील लागते. तर, काही राशींसाठी शनिचे उलट गतीने होणारे संक्रमण काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकते. पंचांगानुसार, 15 नोव्हेंबरला शनि प्रत्यक्ष गतीने भ्रमण करू लागेल. जून ते नोव्हेंबर या काळात प्रतिगामी शनीच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींचं भाग्य उजळेल ते पाहू.
मेष रास (Aries Horoscope)
शनीची उलटी चाल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानली जाते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला नोकरीच्या नवीन ऑफर देखील मिळू शकतील. कुटुंबात वातारण शांततेचे राहील. तुमची आर्थिक परिस्थितीही स्थिर राहणार आहे. म्हणजेच, तुम्हाला ना फायदा ना तोटा होईल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनिची उलटी चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या कमी होतील. मुलांशी संबंधित तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचं आरोग्य चांगलं राहील. तसेच, आर्थिक स्थितीही मजबूत राहील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांना शनिच्या प्रतिगामी हालचालीमुळे मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसे, अनपेक्षितपणे पैसा तुमच्याजवळ येईल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद असेल. करिअरची स्थितीही चांगली राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :