Shani Dev : 'या' 3 राशींवर शनीची साडेसाती सुरु, तर 2 राशींवर ढैय्या; पुढच्या काळात कोणत्या राशींवर कधी असणार शनीची साडेसाती? जाणून घ्या
Shani Dev : शनीची ढैय्या, साडेसाती, दशा, महादशी आणि वक्री चालमध्ये शनीचा (Shani Dev) ज्या लोकांवर प्रभाव आहे अशा लोकांकडून फार खर्च करून घेतात.
Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायदेवता म्हटलं गेलं आहे. शनी (Lord Shani) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. शनीची ढैय्या, साडेसाती, दशा, महादशी आणि वक्री चालमध्ये शनीचा (Shani Dev) ज्या लोकांवर प्रभाव आहे अशा लोकांकडून फार खर्च करून घेतात. व्यक्तीच्या कर्माचा पाढा यावेळी वाचला जातो.
खरंतर शनीची साडेसाती, वक्री चाल हे एका विशेष अंतराने लागू होते. यामध्ये ढैय्या अडीच वर्षांचा, साडेसाती सात वर्षांची आणि दशा 19 वर्षांचा प्रभाव असतो. जर व्यक्तीचे कर्म चांगले असतील तर शनीचा प्रभावसुद्धा चांगला असतो. पण, जर तुमचे कर्मच वाईट असतील तर शनी मात्र आपला प्रभाव त्या व्यक्तीवर पाडतो. यामध्ये कर्जाच व्यवसाय करणे, व्यसनाच्या आहारी जाणे, गरीबांना त्रास देणे, मूक जीवाची हत्या करणे आणि दैव-देवतांचा अपमान करणे.
कुंभ राशीत शनी
17 जानेवारी 2023 रोजी शनीने कुंभ राशीत प्रवेश केला होता. तेव्हापासून शनी याच राशीत आहे. शनीचं हे राशी परिवर्तन 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत होणार आहे. मीन राशीत शनी 2028 पर्यंत असणार आहे.
शनीची साडेसाती
शनीच्या कुंभ राशीत असल्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशींवर शनीची साडेसाती आहे.
शनीची ढैय्या
कुंभ राशीत शनीने प्रवेश करताच कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या सुरु झाली होती.
मकर राशीवर साडेसाती
मकर राशीवर शनीच्या साडेसातीचा काळ आता संपत आला आहे. मकर राशीवर शनीची साडेसाती 26 जानेवारी 2017 रोजी सुरु झाली होती. ही साडेसाती 29 मार्च 2025 रोजी संपेल.
कुंभ राशीवर साडेसाती
कुभ राशीवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. या राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव 3 जून 2027 पर्यंत असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना 23 फेब्रुवारी 2028 रोजी शनीपासून सुटका मिळेल.
मीन राशीवर साडेसाती
सध्या मीन राशीवर साडेसातीचा प्रभाव सुरु आहे. मीन राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रारंभ सुरु झाला असून त्याचा पहिला टप्पा 29 मार्च 2025 पर्यंत राहणार आहे. या राशीवर 7 एप्रिल 2030 पर्यंत साडेसाती राहणार आहे.
कर्क आणि वृश्चिक राशीवर शनीची ढैय्या
17 जानेवारी 2023 रोजी शनीने कुंभ राशीत प्रवेश करताच कर्क आणि वृश्चिक राशीवर शनीची ढैय्या सुरु झाली होती. शनीची ढैय्या या राशीत अडीच वर्ष राहणार आहे.
इतर राशींवर कधी असणार शनीची साडेसाती?
मेष रास - 29 मार्च 2025 ते 31 मे 2032 पर्यंत
वृषभ रास - 3 जून 2027 ते 13 जुलै 20234 पर्यंत
मिथुन रास - 8 ऑगस्ट 2029 ते 27 ऑगस्ट 2036 पर्यंत
कर्क रास - 31 मे 2032 ते 22 ऑक्टोबर 2038 पर्यंत
सिंह रास - 13 जुलै 2034 ते 29 जानेवारी 2041 पर्यंत
कन्या रास - 27 ऑगस्ट 2036 ते 12 डिसेंबर 2043 पर्यंत
तूळ रास - 22 ऑक्टोबर 2038 ते 8 डिसेंबर 2046 पर्यंत
वृश्चिक रास - 28 जानेवारी 2041 ते 3 डिसेंबर 2049 पर्यंत
धनु रास - 12 डिसेंबर 2043 ते 3 डिसेंबर 2049 पर्यंत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :