Shani Dev : शनीची मार्गी चाल लवकरच...'या' 5 राशींचं उजळेल भाग्य; करिअर, व्यवसायात प्रगतीचाच वाजणार डंका
Shani Dev : दिवाळीनंतर 15 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 07 वाजून 51 मिनिटांनी शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. शनी (Shani Dev) हा सर्वात धिम्या गतीने चालणारा ग्रह आहे. त्यामुळेच शनी (Lord Shani) एका राशीत जवळपास अडीच वर्ष राहतात. त्यामुळे या राशीच्या लोकांना दीर्घ काळापर्यंत शनीच्या साडेसातीचा आणि संकटांचा सामना करावा लागतो. पण, शनी जेव्हा मार्गी होतात तो काळ अत्यंत शुभ मानला जातो. याचा लाभ कोणत्या राशींना (Zodiac Signs) होणार आहे ते जाणून घेऊयात.
दिवाळीनंतर 15 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 07 वाजून 51 मिनिटांनी शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे. यामुळे शश राजयोग जुळून येणार आहे. याचा प्रभाव 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या मार्गी अवस्थेत असल्याने मेष राशीच्या लोकांवर याचा जबरदस्त परिणाम होणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. तसचे, तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती दिसून येईल आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना या काळात चांगलाच लाभ होणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांना कामातून चांगला लाभ मिळेल. तसेच, कामानिमित्त तुम्ही परदेशातही जाऊ शकता. तुम्ही ज्यामध्ये गुंतवणुक कराल त्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. मित्रांच्या सहकार्याने सर्व कामे सोपी होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच, जर तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल तर त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुमच्या आजाराच्या बाबतीत तुम्ही फक्त सतर्क राहण्याची गरज आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या राशीत शनीच्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरु असेल त्यामुळे लवकरच तुम्हाला याचा चांगला लाभ मिळेल. तुमच्या आयुष्यात जे काही संकट असतील ते या काळात दूर होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीचं मार्गी होणं कुंभ रासीच्या लोकांसाठी फार लाभदायक असणार आहे. या राशीच्या लोकांना पार्टनरशिपमधून चांगला लाभ मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांवर कामाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील त्या तुम्ही नेटाने पार पाडाल. मित्रांचा चांगला सहवास लाभेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :