एक्स्प्लोर

Horoscope Today 01 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 01 November 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 01 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. दिवाळीची सुरुवात झाली आहे.  त्यानुसार, आजचा दिवस लक्ष्मीपूजनाचा आहे. त्यामुळे सगळीकडे प्रसन्नतेचं वातावरण आहे. अशातच आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी चांगले तर काही राशींसाठी वाईट परिणाम आणू शकतो.आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज दिवसभरात तुमची धावपळ होईल. तसेच, तुमची महत्त्वाची कामे आज पूर्ण होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचं एखादं काम रखडलं असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्यावर निशाणा साधून असतील. मात्र, तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा. नवीन नोकरीच्या संदर्भात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुमची विवेकबुद्धी चांगली असेल. तसेच,तुमच्या कामात तुम्ही बदल करणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य प्लॅनिंग करा. तसेच,संध्याकाळचा वेळ तुमचा धार्मिक कार्यात जाईल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. त्यामुळे तुम्ही खुश असाल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. दिवाळीचा सण असल्या कारणाने तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, एखाद्या ठिकाणी तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा तणावाचा असणार आहे. तुम्हाला एखाद्या समस्येविषयी मानसिक तणाव जाणवेल. तसेच, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्या संदर्भात तुम्ही चिंतेत असाल. अशा वेळी योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. फक्त नात्यात विश्वास ठेवा. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुम्हाला वडिलोत्पार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, आज लक्ष्मीपूजन असल्या कारणाने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल. अनेक दिवसांपासून तुमचे एखादे काम रखडले असेल तर ते आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला बदल करण्याची गरज आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, तुमचा धार्मिक यात्रेला जाण्याचा प्लॅन ठरु शकतो. देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा असणार आहे. आज संध्याकाळी तुमची मित्रांबरोबर भेटीगाठी होऊ शकतात. त्यामुळे तुमचा वेळ आनंदात जाईल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तु्म्हाला सरकारी योजनांचा पूरेपूर लाभ मिळेल. तसेच, कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्याआधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. सुट्टी असल्या कारणाने मुले सुट्टीचा आनंद घेतील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांनी आज आपल्या कामावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, कोणताही निर्णय घेताना घाईगडबडीत घेऊ नका. कामाच्या संदर्भात तुम्हाला परदेशात जावं लागण्याची शक्यता आहे. तसेच, कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. मित्रांचा सहवास चांगला लाभेल. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी चांगली ऑफर मिळू शकते. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. तुमचं मन धार्मिक कार्यात रमेल. या संदर्भात तुम्ही यात्रेला देखील जाऊ शकता. हाती घेतलेलं काम तुम्ही जबाबदारीने पूर्ण करण्याची गरज आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस काहीसा तणावाचा असणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायावर नीट लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. तसेच, तुमच्या पार्टनरवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल.  

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुम्ही ज्या दिवसाची वाट पाहात होतात तो क्षण लवकरच जवळ येईल. तसेच, कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य तुम्हाला चांगलं मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या जुन्या चुकीतून शिकायला मिळेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच, एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैवर कृपा असेल. तसेच, तुम्हाला आर्थिक लाभ देखील होण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 01 November  2024 : आज लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget