(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : शनीमुळे जुळून आला शश राजयोग; 2025 मध्ये 'या' राशींचं लखलखणार नशीब, राजासारखं जगतील आयुष्य
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी सध्या आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. या राशीत मार्च 2025 पर्यंत विराजमान आहे.
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Lord Shani) एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. शनीच्या (Shani Dev) राशी परिवर्तनाने सर्व 12 राशींवर चांगला आणि वाईट असा परिणाम होतो. शनीला न्यायदेवता म्हणतात. तो प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनी सध्या आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. या राशीत मार्च 2025 पर्यंत विराजमान आहे. शनीच्या शश राजयोगाने 2025 पर्यंत कोणत्या राशींना (Zodiac Signs) लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Horoscope)
शनी या राशीच्या पंचम चरणात आहे. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार लाभदायक असणार आहे. तसेच, तुमच्या आर्थिक संपत्तीत देखील चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीच्या शश राजयोगामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर त्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक करा. विनाकारण पैसे खर्च करु नका. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमचे वाद लवकर संपतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
शनीच्या दुसऱ्या चरणात शश राजयोग जुळून आला आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच मिळेल. तसेच, लवकरच तुम्हाला तुमच्या लग्नासंबंधित शुभवार्ता ऐकायला मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. तसेच, तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: