(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Budh Uday 2024 : 2025 पासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू; डिसेंबरमध्ये ग्रहांचा राजा बुधाचा उदय, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Budh Uday 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाचा वृश्चिक राशीत उदय होणार आहे, ज्यामुळे 3 राशींचं नशीब पालटेल. 2025 पासून या राशींच्या सुख-संपत्तीत अपार वाढ होईल.
Budh Uday 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रहाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो, तेव्हा नोकरी-व्यवसायावर, आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होतो. यातच आता डिसेंबर 2024 मध्ये बुधाचा उदय होणार आहे. बुधाचा वृश्चिक राशीत उदय होईल, ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण अशात मुख्यत: 3 राशींचं नशीब उजळेल. 2025 पासून नोकरी-व्यवसायात बरकत पाहायला मिळेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
सिंह रास (Leo)
बुधाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो . कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून चौथ्या घरात वर येणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. तसेच, यावेळी तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या पदाचा फायदा मिळू शकतो. यावेळी आर्थिक क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. या काळात तुम्ही एखादं वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. या काळात तुमच्या आईशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तसेच, रिअल इस्टेट, मालमत्ता आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्यांना चांगले फायदे मिळू शकतात.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय शुभ असू शकतो. कारण तुमच्या राशीतून कर्म घरावर बुध ग्रहाचा उदय होणार आहे. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. तसेच जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळू शकतात. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडूनही सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला प्रगती आणि पदोन्नती मिळेल. जे व्यावसायिक आहेत, त्यांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
मकर रास (Capricorn)
बुधाचा उदय तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. कारण तुमच्या पारगमन कुंडलीत उत्पन्न आणि लाभ स्थानात बुध ग्रहाचा उदय होईल. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला तुमच्या उत्पन्नात कमालीची वाढ दिसू शकते. तसेच, यावेळी जर तुम्हाला नवीन वाहन घ्यायचं असेल किंवा घर किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी उत्तम काळ आहे. या काळात गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्येही फायदा होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: