Shani Dev : दिवाळीच्या आधी राहू आणि शनीची टक्कर; 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, पगारवाढीसह बँक बॅलन्स वाढणार
Shani 2024 : दिवाळीच्या आधी शनीचं मोठं नक्षत्र परिवर्तन होणार आहे, ज्यामुळे काही राशींचं भाग्य उजळेल. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Shani Nakshatra Parivartan : दिवाळीपूर्वी शनीच्या (Shani) चालीत मोठा बदल होणार आहे. हा बदल शनि आणि राहूमध्ये होईल, यामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात बदल घडतील. 3 ऑक्टोबरला, गुरूवारी दुपारी 12:10 वाजता शनि राहूच्या शतभिषा नक्षत्रात (Shatbhisha Nakshatra) प्रवेश करेल. यंदा दिवाळी १ नोव्हेंबरला आहे.
सध्या शनि कुंभ राशीत पूर्वगामी आहे. शनी वक्री स्थितीतच राहूच्या नक्षत्रात प्रवेश करेल. शनि ज्या नक्षत्रात जात आहे, त्या शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू (Rahu) आहे. शनी या वर्षी फक्त तीन वेळा नक्षत्र बदलत आहे. शनीचं प्रथम नक्षत्र परिवर्तन एप्रिलमध्ये झालं, त्यांनंतर आता 3 ऑक्टोबरला दुसरं आणि डिसेंबरमध्ये शनीचं तिसरं नक्षत्र परिवर्तन होईल.
शनि आणि राहूच्या एकत्र येण्याने अनेक राशींचं भाग्य उजळेल. काहींसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन शुभ ठरेल, तर काहींच्या जीवनात समस्या येऊ शकतात. शनीचं नक्षत्र परिवर्तन कोणत्या राशीसाठी भाग्याचं ठरेल? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
शनीचं नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं,यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. संपत्तीच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल. या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. तसेच नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकतं.
धनु रास (Sagittarius)
शनिने नक्षत्र बदलणं हे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. यात परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. तसेच या काळात तुमच्या बोलण्यात प्रभाव दिसून येईल. या काळात लोक तुमच्या बोलण्यावर प्रभावित होऊ शकतात. तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात चांगले फायदे होतील. उच्च शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना या दिशेने यश मिळू शकतं.
कुंभ रास (Aquarius)
शनि परिवर्तन तुमच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतं. शनिदेवाने तुमच्या राशीत शश राजयोगही निर्माण केला आहे, त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच यावेळी तुम्ही लोकप्रिय व्हाल. तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळेल. राजकारणाशी संबंधित या राशीच्या लोकांना या काळात काही महत्त्वाचं यश मिळू शकतं. यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखी होईल. तसेच, अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :



















