'व्हॅलेंटाईन डे'च्या आधी शनी बदलणार चाल; 'या' राशीच्या लोकांना धोक्याचा इशारा, जोडीदार होऊ शकतो नाराज, ब्रेकअपचीही शक्यता
Shani Dev : शनि कर्माच्या आधारे फळ देतात. फेब्रुवारीमध्ये शनि कुंभ राशीत अस्त होईल आणि काही राशीच्या समस्या वाढणार आहे. जाणून घेऊया या राशींविषयी
Shani Ast 2024: शनिदेवाला न्यायाची देवता असे देखील म्हणतात. शनिदेव आपल्या वर्तमानकाळातील आणि पूर्वजन्मीच्या कर्मानुसार फळ देतात. शनीदेव सध्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीमध्ये विराजमान आहेत. लवकर शनीदेव त्यांची चाल बदलणार आहे. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन वीकमध्येच शनीदेव आपली चाल बदलणार आहे. 11 फेब्रुवारी म्हणजे प्रॉमीस डेच्या दिवशी त शनी अस्त होणार आहे. व्हॅलेंटाइन डेच्या आधी शनीच्या अस्तामुळे काही राशींच्या प्रेम जीवनात चढ-उतार येऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी या काळात काळजी घेणे आवश्यक आहे.
11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2024 या कालावधीत शनी अस्त होणार आहे. शनी जयंतीपूर्वी 18 मार्चला शनीचा पुन्हा उदय होणार आहे. शनीची नवी चाल ही काही राशींसाठी लाभदायक आहे. तर काही काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वृषभ, कर्क, धनु, मकर या चार राशींनी विशेष काळजी घेण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus)
शनीच्या अस्तामुळे वृषभ राशीच्या लोकांना खूप काळजी घ्यावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनाची काळजी घ्यावी लागेल. लव लाईफसाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो. शनिदेव तुमच्या नात्याची परीक्षा घेतील. यावेळी, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी वाद टाळावे, अन्यथा ब्रेकअपची परिस्थिती देखील उद्भवू शकतात. नात्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या दोघांमध्ये तणाव वाढू शकतो आणि त्यामुळे अंतरही निर्माण होऊ शकते.
कर्क (Cancer)
शनीच्या अस्तामुळे कर्क राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधात दुरावा येऊ शकतो. तुमच्या प्रिय व्यक्तीबद्दल तुमचे वाद होतील. एवढेच नाही तर एकमेकांबद्दल संशयाची भावनाही निर्माण होऊ शकते. शनी देवाच्या अस्ताच्या प्रभावामुळे शनी तुमच्या दोघांमध्ये गैरसमजाची भिंत निर्माण करू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे. प्रत्येक नात्यात चढउतार असतात मात्र समजूतदारपणा दाखवल्यास नाते फुलेल. आपल्या मनात असलेल्या भावना, शंका याविषयी दोघांनीही एकमेकांशी मोकळेपणाने बोलले पाहिजे. विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनातही चढ-उतार येऊ शकतात.
धनु (Sagittarius)
शनीच्या अस्तामुळे धनु राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मतभेदामुळे तुमचे बिघडू शकतात.तसेच दोघांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने वाद वाढू शकतात. तुमच्या दोघांमध्ये भांडणही होऊ शकते. त्यामुळे या काळात अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराशी बोलताना तुमचे शब्द खूप विचारपूर्वक पावा. एखादा चुकीचा शब्द तुमचे नाते खराब करु शकतो. म्हणजे तुमचे नाते विभक्त होण्याच्या टप्प्यापर्यंत येऊ शकतो. या राशीचे लोक ज्यांचे लग्न झाले आहे त्यांनीही आपल्या जोडीदारासोबत संयमाने वागावे.
मकर (Capricorn)
शनीच्या अस्तानंतर मकर राशीचे लोकांमध्ये आक्रमकपणा वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमच्या स्वभावामुळे तुमच्या जोडीदारासोबत वाद वाढू शकतात. तुमचे नातेही बिघडू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. वेळ दिल्याने तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाता आणि तुमच्यातील गैरसमज दूर होतील. तसेच शनि देव तुमच्या वैवाहिक जीवनाचीही परीक्षा घेतील. अशा स्थितीत तुम्हाला तुमचे नाते संयमाने हाताळावे लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)