Shani Dev: 15 दिवसांनंतर 'या' राशींवर शनि करणार कृपा! आता कलियुग दंडाधिकारी देणार नाही त्रास
Shani Dev: 15 दिवसांनी आणि विशेष म्हणजे 30 वर्षांनी शनि कुंभ राशीत प्रवेश करेल, यामुळे काही राशींचे भाग्य उजळेल. कोणत्या आहेत त्या राशी?
Shani Dev : ज्योतिषशास्त्रात (Astrology) शनिदेवाला (Shani Dev) न्यायाची देवता म्हटले जाते. ते प्रत्येकाला त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतात. म्हणूनच त्याला कर्माचा दाता असेही म्हणतात. पंचांगानुसार, 15 दिवसांनी आणि विशेष म्हणजे 17 जानेवारी 2023 रोजी 30 वर्षांनी शनि कुंभ राशीत प्रवेश करतील. शनीने कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर या राशींचे भाग्य उजळेल. कोणत्या आहेत त्या राशी? जाणून घ्या
शनीच्या साडेसाती आणि ढैय्यापासून मिळेल मुक्ती
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा शनि राशी बदलतात (Shani Rashi Parivartan) किंवा त्यांची जागा बदलतात, तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. या दरम्यान शनिदेव काही राशींना ढैय्यापासून तर काही राशींना साडेसातीपासून मुक्त करतात. ज्या राशींना शनीच्या साडेसाती आणि ढैय्यापासून मुक्ती मिळते, त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि त्यांना त्यांच्या सर्व कामांमध्ये यश मिळू लागते.
शनीची साडेसाती म्हणजे काय?
शनीची साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालावधी. शनीला 12 राशींमधून प्रवास करण्यासाठी 30 वर्षे लागतात, म्हणजेच शनि एका राशीत अडीच वर्षे राहतात. "जेव्हा कुंडलीतील चंद्र राशीतून शनीचे संक्रमण 12व्या भावात सुरू होते, तेव्हापासून त्या राशीवर साडेसाती सुरू होते".
या राशींचे भाग्य उजळेल. कोणत्या आहेत त्या राशी?
धनु
धनु राशीच्या लोकांना प्रदीर्घ काळानंतर शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. त्यांचे दुःख संपेल. आर्थिक प्रगती होईल. मानसिक तणाव आणि रोगापासून मुक्ती मिळेल. भाग्य तुमच्या सोबत राहील.
मिथुन
कुंभ राशीत शनीचे परिवर्तन मिथुन राशीतील शनि प्रभावाचा प्रभाव संपवेल. त्यांना तणावातून आराम मिळेल. करिअरमध्ये चांगला काळ सुरू होईल.
तूळ
17 जानेवारीला तूळ राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळेल. त्यांचे थांबलेले काम आता सुरू होणार आहे. तणाव कमी होईल. मानसिक सुख-शांती मिळेल. पैसा आणि करिअरच्या क्षेत्रात यश मिळेल.
कुंभ
भगवान शनी कुंभ राशीचा अधिपती ग्रह आहे. ते तुमच्या राशीतून लग्न गृहात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या