(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Amavasya 2024 : शनी अमावस्येला तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय; नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळेल पुण्य फळ
Shani Amavasya 2024 : शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे आज शनीची कृपा राहावी म्हणून अनेक जण उपवास आणि उपाय करतात.
Shani Amavasya 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) कर्म आणि सेवाचा कारक ग्रह मानला जातो. शनी (Lord Shani) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे आज शनीची कृपा राहावी म्हणून 12 राशींच्या (Zodiac Signs) लोकांनी कोणकोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी घरात श्री शिव रुद्राभिषेक करा. यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांनी नियमितपणे महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा. यामुळे तुम्हाला शांती मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
आजच्या दिवशी तुम्ही महाराज दशरथकृत नील शनी स्त्रोताचं पठण नक्की करावं. तुमचं मन प्रसन्न राहील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी लोखंडाच्या भांड्यात मोहरीचं तेल ओतून त्यात तुमचा चेहरा पाहा.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांनी काळे तीळ किंवा साबुदाणा दान करणं शुभ मानलं जाईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशींच्या लोकांनी आजच्या दिवशी प्रां प्रीं प्रौं स:शनैश्चराय नम:' या मंत्राचा नियमित जप करावा.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांनी नियमितपणे शमी वृक्षाला जल अर्पण करुन पूजा करावी.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
आजच्या दिवशी तुम्ही एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीची मदत करावी.
धनु रास (Sagittarius Horoscope)
आजच्या दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी घरात मुंग्या असतात त्या ठिकाणी साखर आणि गव्हाचं पीठ घालावं.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांनी महाराज दशरथकृत नील शनी स्त्रोताचं पठण करणं शुभ ठरेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
आजच्या दिवशी तुम्ही नीलम रत्न परिधान करु शकता. यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी लहान मुलांशी चांगला व्यवहार करा. तसेच, धार्मिक स्थळाला भेट द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: