(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Amavasya 2024 : आज वर्षातील शेवटची शनी अमावस्या; 'या' 3 राशींवर राहील शनिदेवाची कृपा, सर्व चिंता होतील दूर
Shani Amavasya 2024 : या अमावस्येला शनिश्चरी अमावस्या देखील म्हणतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी काही राशींनी शनीच्या वाईट परिणामांपासून दूर राहण्यासाठी काही खास उपाय करणं गरजेचं आहे.
Shani Amavasya 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात एक अमावस्या आणि एक पौर्णिमा तिथी असते. अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्याच्या पंधराव्या तिथीच्या दिवशी असते. ही अमावस्या तिथी पितरांना समर्पित मानली जाते. त्यानुसार आज शनी अमावस्या (Shani Amavasya) आहे. या अमावस्येला शनिश्चरी अमावस्या देखील म्हणतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी काही राशींनी शनीच्या वाईट परिणामांपासून दूर राहण्यासाठी काही खास उपाय करणं गरजेचं आहे. त्यामुळे या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
अमावस्येच्या दिवशी दान-स्नानाचं विशेष महत्त्व
ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशीची ही अमावस्या फार खास असणार आहे. आजच्या दिवशी स्नान-दानाला विशेष महत्त्व आहे. तसेच, आज राशी परिवर्तन योगासह, अतिगंड योग देखील जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. मान्यतेनुसार, आजच्या दिवशी शनी संबंधित काही उपाय केल्यास शनीचे अशुभ प्रभाव कमी होतात.
'या' राशींवर असणार शनीची कृपादृष्टी
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुमचे तुमच्या पार्टनरबरोबर चांगले व्यवहार असतील. एकमेकांच्या नात्यात विश्वास असेल. आजच्या दिवशी तुम्ही एखाद्या गोष्टीत गुंतवणूक करु शकता. यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. वाणीत मधुरता ठेवा. तसेच, सामाजिक कार्यात सहभागी व्हा.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रेरणादायी असणार आहे. आज तुमचे तुमच्या कुटुंबियांबरोबर चांगले संबंध असतील. आज अमावस्या तिथी असल्या कारणाने तुमच्या घरात धार्मिक वातावरण पाहायला मिळेल. आजच्या दिवशी दान देण्याचं पुण्य काम करा. तसेच, तुमच्या व्यवसायातील नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. शनीदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात चांगले बदल पाहायला मिळतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुमची प्रगती पाहायला मिळेल. जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. यातून तुम्हाला चांगलाच लाभ मिळेल. तुमच्या कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: