Scorpio Weekly Horoscope 6 To 12 February 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांचा हा आठवडा भाग्याचा! नशिबाची साथ मिळेल, साप्ताहिक राशीभविष्य
Scorpio Weekly Horoscope 6 To 12 February 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंददायी राहील. सहकाऱ्यांशी समन्वय चांगला राहील. साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Scorpio Weekly Horoscope 6 To 12 February 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना 6 ते 12 फेब्रुवारी 2023 या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल आणि त्यांचे भाग्य वाढेल. काही महत्त्वाची थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात, मनामध्ये आनंद राहील. मित्र तुम्हाला मदत करतील, तसेच नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकू येईल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंददायी राहील. सहकाऱ्यांशी समन्वय चांगला राहील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. व्यापारी वर्गाला विशेष फायदा होईल. व्यावसायिक संबंध विकसित होतील. जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
नवीन संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला विरोधक नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सावध राहा. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. आंतरिक क्षमता विकसित होईल. तुमची अध्यात्मावर श्रद्धा निर्माण होईल. उच्चपदस्थांकडून मान-सन्मान मिळेल. महत्वाच्या लोकांकडून मिळालेली प्रशंसा तुमच्या करिअरला चालना देईल.
आयुष्याची नवीन दारे उघडणार
फेब्रुवारीचा हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आयुष्याची नवीन दारे उघडणार आहे. ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे, अशा परिस्थितीत तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न केल्यास तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात कोणताही नवीन व्यवहार अपेक्षेप्रमाणे नफा देईल. मात्र, आरोग्य आणि वडिलोपार्जित मालमत्तेबाबत गाफील राहू नका, अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागू शकते. विशेषत: आजारांबाबत जागरूक रहा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. लव्ह लाईफचे रुपांतर वैवाहिक जीवनात होऊ शकते.
मानसिक दडपण घेऊ नका
आठवड्याच्या मध्यात नवीन शक्यता आणि गुंतागुंत दोन्ही दिसतील. जोडीदाराच्या सहकार्यामुळे सर्व मतभेद दूर होतील. वैवाहिक जीवनात वाद निर्माण होतील. बौद्धिक क्षमतेत थोडीशी घट होईल. मानसिक दडपण थोडे कमी होण्याची चिन्हे आहेत. आध्यात्मिक मूल्यांकडे कल वाढेल.
आरोग्य सांभाळा
सप्ताहाच्या शेवटी काही चांगले घडेल. नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. हृदय किंवा रक्ताचे विकार होण्याची शक्यता आहे. पोटात दुखू शकते. उद्धटपणे वागणे टाळा. खर्चात कपात करणे आवश्यक आहे. अनुभवी व्यक्तीचा अनुभव घेऊन कामे होतील.
शुभ रंग- नारिंगी, लाल
शुभ अंक- 3, 9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Libra Weekly Horoscope 6 To 12 February 2023 : तूळ राशीच्या लोकांना नोकरीत बढतीचे संकेत, कामात यश, साप्ताहिक राशीभविष्य