Saphala Ekadashi 2024 : यंदाची सफला एकादशी 3 राशींसाठी ठरणार खास; 26 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Saphala Ekadashi 2024: सफला एकादशी काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, जे 3 राशींचं नशीब पालटू शकतात.
Astrology 26 December 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, सफला एकादशीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच 26 डिसेंबरपासून (Saphala Ekadashi 2024) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. 25 डिसेंबरला चंद्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे, त्याचसोबत 27 डिसेंबरला शनीचं नक्षत्र परिवर्तन होत आहे. शनि 27 डिसेंबर रोजी रात्री 10:42 वाजता पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे, ज्याचा शुभ परिणाम 3 राशींवर होईल. यासोबतच 26 डिसेंबरला सफला एकादशीसोबत मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार देखील आहे, त्यामुळे 26 डिसेंबरपासून या राशींच्या सुख-संपत्तीत अपार वाढ होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या चढत्या घरात गुरु ग्रह स्थित आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं, तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं, तसेच पगारातही वाढ होऊ शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. तुमच्या जीवनात सुख-समृद्धी नांदेल. आरोग्यही चांगलं राहील.
कन्या रास (Virgo)
पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश या राशीच्या लोकांसाठीही शुभ ठरू शकतो. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. यामुळे मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. तुमचं काम पाहून वरिष्ठ अधिकारी खूश होतील. शैक्षणिक क्षेत्रात भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे, यामुळे वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. तुमचं जीवन आनंदाने बहरू शकतं.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचा नक्षत्र बदल फायदेशीर ठरू शकतो. शनीच्या कृपेने तुम्हाला मोठ्या आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात भरीव यश मिळू शकतं. शारीरिक समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. अशा परिस्थितीत तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. आर्थिक लाभासोबत बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमचं जीवन सुखसोयींनी भरलेलं असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :