निसर्गाची किमया न्यारी! तुकाराम बीजेला देहूत 12 वाजता वातावरण होते स्तब्ध, जाणून घ्या वैकुंठ गमनाच्या वेळी नेमकं काय घडते?
Tukaram Beej : देहुला ज्या ठिकाणाहून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केले त्या ठिकाणचा वृक्ष दरवर्षी तुकाराम बीजेच्या दिवशी 12 वाजता हलतो, आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
Tukaram Beej : संत तुकाराम महाराजांच्या (Sant Tukaram Maharaj) सदेह वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम बीज (Tukaram Beej) म्हणून ओळखला जातो. यंदा 27 मार्च रोजी म्हणजे बुधवारी तुकाराम बीज साजरी करण्यात येणार आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाले असे मानले जाते. या निमित्ताने पुण्याजवळील देहू (Dehu, Pune) गावात मोठा उत्सव साजरा केला जातो. पंढपुरचा विठ्ठल हे तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत आहे. देहुला आजही वैकुंठगमन झालेल्या स्थानी एक चमात्कार पाहायला मिळतो. तो म्हणजे ज्या ठिकाणाहून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केले त्या ठिकाणचा वृक्ष आजची दरवर्षी 12 वाजता हलतो, आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
देहुला संत तुकाराम महाराजांनी जिथून वैकुंठ गमन केले त्या ठिकाणावरील नांदुरकी वृक्ष आजही तुकाराम बीजेला 12 वाजून दोन मिनिटानी म्हणजे ज्यावेळी संत तुकाराम महाराज ज्यावेळी वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो. याची अनुभूती घेण्यासाठी अनेक वारकरी दरवर्षी देहुला गर्दी करतात. तुकारामांना वारकरी संप्रदाय जगद्गुरु म्हणून ओळखतात. देहूच नाही तर महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने तुकाराम बीज साजरी केली जाते.
वारकरी संप्रदायाचा तुका झालासे कळस!
ज्ञानदेवे रचिला पाया, ............ तुका झालासे कळस! वारकरी संप्रदायाचा कळस झालेल्या संत तुकारामांची बीज बुधवारी आहे. ज्या तुकारामांनी विश्वाला वारकरी संप्रदायाचा पाठ दिला. अध्यात्माची शिकवण देऊन भक्ती मार्गाला लावले अशा तुकाराम महाराजांचा वृक्ष हलतो. संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातून अध्यात्माची शिकवण वारकरी संप्रदायाला दिली आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून बुवाबाजी नष्ठ करण्याचा आणि खऱ्या भक्तीमार्गाचा प्रसार करण्याचे काम केले. त्यांचे अध्यात्म अतिशय परखड होते. संत तुकाराम महाराजांनी संपूर्ण विश्वाला जप मंत्र म्हणजे जय जय राम कृष्ण हरी दिला.
नांदुरकी वृक्षाला अनन्य साधारण महत्त्व
श्रीरामाने शरयु नदीत देह समर्पित केला तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात, म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतार होते. परंतु मानव असूनही सदेह जाण्याचे (वैकुंठगमनाचे) सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते, असे वारकरी संप्रदायात मानले जाते. नांदुरकी वृक्षाच्या त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैकुंठातील विष्णु-ऊर्जा स्थळाला 12.02 मिनिटांनी स्पर्श करते. त्याचवेळी विष्णुतत्त्वात्मक प्रकट ऊर्जेचे भूमीवर अवतरण होते आणि त्यामुळे या ऊर्जेच्या स्पर्शाने वृक्षाची पाने हलतांना दिसतात, असे म्हटले जाते
वृक्ष हलतो तेव्हा वातावरण स्तब्ध
नांदुरकी वृक्ष हलतो, त्या वेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होते, या वेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होते. जणुकाही इतर पशु-पक्षी, झाडेही हा क्षण बघण्यासाठी आतुर झालेले असतात. ते आपल्या सर्व हालचाली थांबवून स्तब्ध झालेले असतात, असे वाटते, असे वारकरी म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Sankashti Chaturthi 2024:गुरुवारी संकष्टी चतुर्थी; चुकूनही करू नका 'या' सहा गोष्टी,अन्यथा सर्व विधी करूनही मिळणार नाही इच्छित फळ