एक्स्प्लोर

Sankasht Chaturthi 2024 : आज संकष्ट चतुर्थीला ‘असा’ करा लाडक्या बाप्पासाठी उपवास; जाणून घ्या तुमच्या शहरानुसार चंद्रोदयाची वेळ

Sankasht Chaturthi 2024 : संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचा विशेष विधी आहे, त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. या वर्षी संकष्टी चतुर्थीला विविध योग जुळून आले आहेत.

Sankasht Chaturthi 2024 : हिंदू धर्मग्रंथानुसार, संकष्ट चतुर्थीचे (Sankashti Chaturthi) व्रत विशेष मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. या शुभ दिवशी गणपतीची पूजा करतात. भक्त लाडक्या बाप्पासाठी उपवास करतात. त्यानुसार, आज संकष्ट चतुर्थी आहे. तसेच, आज संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची शुभ वेळ काय असणार आहे ते जाणून घेऊयात.  

संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचा विशेष विधी आहे, त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. या वर्षी संकष्टी चतुर्थीला विविध योग जुळून आले आहेत, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. संकष्टी चतुर्थी 2024 चे शुभ योग, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया.

संकष्टी चतुर्थी 2024 तिथी, शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी बुधवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 6 मिनिटांनी सुरु होईल आणि गुरुवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 2 मिनिटांनी संपेल. निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत 18 डिसेंबरला केले जाईल.

संकष्टी चतुर्थी 2024 चंद्रोदय वेळ

संकष्टी चतुर्थीची वेळ ही प्रत्येक शहरानुसार वेगळी असते. त्यानुसार मुंबईत चंद्रोदयाची वेळ रात्री 09 वाजून 03 मिनिटांनी असणार आहे. या वेळेत तुम्हाला चंद्राचं दर्शन घेता येईल. या वेळेस चंद्राची पूजा करावी. संकष्ट चतुर्थीला चंद्राशिवाय पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानलं जातं. त्यामुळे चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत सोडावं. 

तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

मुंबई - 09.03
बीड - 08.50
ठाणे - 09.02
सांगली - 08.59
पुणे - 08. 59
सावंतवाडी - 09.04
रत्नागिरी - 09.04
सोलापूर - 08.52
कोल्हापूर - 09.01
नागपूर - 08.32
सातारा  - 09.00
अमरावती - 08.38
 नाशिक - 08.57
अकोला - 08.42
अहमदनगर -08.54
औरंगाबाद - 08.50
पणजी - 09.05
भुसावळ- 08.46
धुळे - 08.51
परभणी - 08.46
जळगाव - 08.47
नांदेड-08.43
वर्धा - 08.35
उस्मानाबाद - 08.51
यवतमाळ- 08.38
भंडारा - 08.30
चंद्रपूर - 08.34
बुलढाणा - 08.46
इंदौर- 08.26
ग्वाल्हेर - 07.54
बेळगाव - 09.02
मालवण- 09.06

संकष्टी चतुर्थीची पूजेची पद्धत

  • संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वात आधी पहाटे उठून अभ्यंगस्नान करावं. आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. 
  • त्यानंतर विधीनुसार गणेशाची पूजा करावी. 
  • गणपतीची मूर्ती फुलांनी सजवावी. 
  • बाप्पाला चंदनाचा टिळा लावून फुले अर्पण करावीत. 
  • त्यानंतर भगवान गणेशाचा आवडता पदार्थ मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करा. 
  • श्री गणेशाच्या मंत्राचा जप करा. 
  • उपवास करत असाल तर अन्नाचे सेवन अजिबात करू नका. 
  • संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी गणेशाची पूजा करून संकष्टी व्रत कथा वाचावी.
  • रात्री चंद्र पाहून उपवास सोडावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Sankasht Chaturthi 2024 : आज वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी; आजच्या दिवशी 'या' गोष्टी कराच, बाप्पा होईल प्रसन्न

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shukra Transit 2026 : शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?
शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?
Vastu Tips : काय सांगता! पोपटाकडे असते तुमचं भाग्य बदलण्याची क्षमता? जाणून घ्या पोपटाशी संबंधित मान्यता आणि परिणाम
काय सांगता! पोपटाकडे असते तुमचं भाग्य बदलण्याची क्षमता? जाणून घ्या पोपटाशी संबंधित मान्यता आणि परिणाम
Sun Transit 2026: जूनची 15 तारीख अद्भूत! 4 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार, पॉवरफुल बुधादित्य राजयोग बनतोय, पैसा डबल, नवा फ्लॅट, नोकरी...
जूनची 15 तारीख अद्भूत! 4 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार, पॉवरफुल बुधादित्य राजयोग बनतोय, पैसा डबल, नवा फ्लॅट, नोकरी...
Astrology Zodiac Signs : संकट, दु:ख आणि कष्ट...! 'या' 5 राशींचं आयुष्य असतं खडतर, वेळोवेळी संघर्षाचा करावा लागतो सामना
संकट, दु:ख आणि कष्ट...! 'या' 5 राशींचं आयुष्य असतं खडतर, वेळोवेळी संघर्षाचा करावा लागतो सामना

व्हिडीओ

Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला
WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
BJP : भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
PhysicsWallah : फिजिक्सवालाच्या शेअरमध्ये 15 टक्के तेजी, काय आहेत तेजीची प्रमुख कारणं, जाणून घ्या एका क्लिकवर
फिजिक्सवालाच्या शेअरमध्ये 15 टक्के तेजी, काय आहेत तेजीची प्रमुख कारणं, जाणून घ्या एका क्लिकवर
Rishabh Pant : उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या सहायक प्रशिक्षकानं मौन सोडलं, फलंदाजीवर सल्ला देत म्हणाले... 
उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकानं मौन सोडलं, नेमकं काय म्हटलं?
Vidhan Parishad : कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
Embed widget