Sagittarius Weekly Horoscope 2024 : धनु राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा तितकाच आव्हानात्मक; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Sagittarius Weekly Horoscope 30 September to 06 October 2024 : धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Sagittarius Weekly Horoscope 30 September to 06 October 2024 : राशीभविष्यानुसार, धनु राशीसाठी हा काळ वरदानाप्रमाणे असेल. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु राशीची लव्ह लाईफ (Sagittarius Love Horoscope)
नवीन आठवड्यात तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. या संकटांना तुम्ही वाद न घालता सोडविण्याचा प्रयत्न करावा. तसेच, पार्टनरला रोमॅंटिक डिनर डेटला किंवा लॉंग ड्राईव्हला घेऊन जा. तसेच, तुमच्या नात्यात जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा आणू नका. याचा तुमच्या नातेसंबंधावर फार गंभीर परिणाम होऊन तुम्ही दुरावू शकता.
धनु राशीचे करिअर (Sagittarius Career Horoscope)
नवीन आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन प्रयोग करायला मिळू शकतात. तसेच, सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणाव जाणवणार नाही. मात्र, तुम्हाला देखील भरपूर मेहनत करावी लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. आयटी प्रोफेशनल्स, डिझाईनर, शिक्षण आणि हेल्थ केअर प्रोफेशन्स लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)
नवीन आठवड्यात धनु राशीची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. या कालावधीत तुम्ही नवीन वाहन, घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करु शकता. तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल त्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही.
तसेच, घरातील कौटुंबिक स्थिती देखील चांगली असेल. कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.
धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope)
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तब्येतीच्या छोट्या-मोठ्या तक्रारी जाणवू शकतात. यामुळे तुमचं मन सतत विचलित असेल. यासाठी आरोग्याची नीट काळजी घ्या. डायबिटीज आणि ब्लड शुगरच्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: