Sagittarius Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : नवीन आठवड्यात धनु राशीचं नशीब पालटणार; खिसा भरलेला राहणार, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Sagittarius Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : धनु राशीसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. या आठवड्यात तुमचा खूप खर्च होईल, तरीही तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
Sagittarius Weekly Horoscope 10th To 16th March 2024 : धनु राशीसाठी नवीन आठवडा फलदायी ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नोकरी-व्यवसायात चांगले परिणाम पाहायला मिळतील. उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतांमधून तुम्ही चांगला पैसा कमवाल. नोकरीत तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. एकूणच धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु राशीची लव्ह लाईफ (Sagittarius Love Horoscope)
नवीन आठवड्यात तुम्ही प्रियकराशी नीट वागा, भूतकाळातील बाद सोडवा. जोदीडारासोबत चांगला वेळ घालवा, चांगला प्लॅन बनवून कुठेतरी बाहेर फिरायला जा. जोडीदारासोबत प्रामाणिक रहा आणि कोणतीही समस्या हाताबाहेर जाण्यापूर्वीच त्या सोडवा. जे अद्याप एकटेच आहेत त्यांच्या आयुष्यात एक खास व्यक्ती येईल. तरुणांनी थोडं स्मार्ट वागावं, यामुळे तुम्हाला तुमच्या क्रशचं मन जिंकता येईल.
धनु राशीचे करिअर (Sagittarius Career Horoscope)
व्यवसायात तु्म्हाला नवीन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. नोकरदारांना या आठवठ्यात चांगलं यश मिळेल. तुम्ही सर्व कामं वेळेवर पूर्ण कराल. ज्युनियर आणि सिनीयरशी तुम्ही चांगले संबंध ठेवाल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही उत्तम पॅकेजसाठी जास्त पगाराची नोकरी शोधू शकता. व्यावसायिक जर भागीदारीत व्यवसाय करू इच्छित असतील तर तुम्हाला गुंतवणूकदार मिळेल, चांगला भागीदार मिळेल. परंतु कोणताही करार करण्याआधी सावधगिरी बाळगा.
धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)
नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि कितीही समस्या आल्या तरी त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होणार नाही. तुम्हाला या आठवड्यात पैशाची चणचण भासणार नाही. तुम्ही चैनीच्या वस्तूंवर अधिक पैसे खर्च कराल. तुम्ही वाहन खरेदीचा निर्णयही घेऊ शकता. आठवड्याचे शेवटचे दिवस शेअर बाजारात नशीब आजमावण्यासाठी चांगले आहेत, परंतु या दरम्यान तुम्हाला सतर्क राहावं लागेल.
धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope)
या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. ताप, घसा खवखवणे आणि पचनाच्या समस्यांमुळे थोडा त्रास होऊ शकतो. त्वचेशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. बाहेर खेळताना किंवा कॅम्पिंगला वैगेरे जाताना सावधगिरी बाळगा, किरकोळ दुखापत होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: