Sagittarius Monthly Horoscope: धनु राशीसाठी ऑगस्ट महिन्यात नोकरीमध्ये विरोधक कट रचणार? जपून, सावध राहा, मासिक राशीभविष्य वाचा
Sagittarius Monthly Horoscope August 2025: धनु राशीच्या लोकांचं करिअर, शिक्षण, प्रेम आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल? यासाठी धनु राशीचं मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात.

Sagittarius Monthly Horoscope August 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टचा (August) महिना लवकरच सुरु होतोय. या महिन्यात श्रावणाबरोबरच अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. ग्रहांच्या या संक्रमणाचा धनु राशीवर नेमका कसा परिणाम होणार आहे. तसेच, वृश्चिक राशीच्या लोकांचं करिअर, शिक्षण, प्रेम आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल? यासाठी धनु राशीचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.
धनु राशीची लव्ह लाईफ (Sagittarius August 2025 Love Life Monthly Horoscope)
धनु राशीच्या प्रेमसंबंधाबद्दल बोलायचं झाल्यास, प्रेम जीवनात लहान समस्या आणू शकतो, परंतु महिन्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल. राहूचा पाचवा भाव असल्याने कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. गुरु-शुक्रचा शंख योग असेल, ज्यामुळे कुटुंबात स्नेह आणि सुसंवाद वाढेल.
धनु राशीचे करिअर (Sagittarius August 2025 Career Monthly Horoscope)
धनु राशीच्या करिअर बद्दल बोलायचं झाल्यास, ऑगस्ट महिन्यात नोकरीमध्ये विरोधक कट रचल्याने तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वाद टाळावे लागतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी चढ-उतार आणू शकतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांना धैर्याने तोंड द्यावे लागेल. सर्वार्थसिद्धी योग मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी यशाचे दरवाजे उघडतील.
धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius August 2025 Wealth Monthly Horoscope)
धनु राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, ऑगस्ट 2025 हा महिना लक्ष्मी योगाच्या प्रभावामुळे मोठे आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना बाजारातून नफा मिळू लागेल. बुधादित्य योग असेल, ज्यामुळे फॅशन बुटीक, ब्लॉगिंग, महिलांचे रेडीमेड कपडे आणि केक-पेस्ट्री व्यवसायात नवीन योजनांद्वारे कमाईच्या संधी वाढतील. फसवणुकीपासून सावध राहण्याचे संकेत देत आहे.
धनु राशीचे आरोग्य (Sagittarius August 2025 Health Monthly Horoscope)
धनु राशीसाठी आरोग्याच्या बाबतीत ऑगस्ट महिन्यात घसा, डोळे आणि झोपेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मंगळ-शनीची दृष्टी राग, रक्तदाब आणि पोटदुखीमुळे होणाऱ्या समस्या दर्शवत आहे. कुटुंबासह धार्मिक सहलीचे नियोजन करता येईल
हेही वाचा :
Numerology: ऑगस्टची सुरूवात होताच 'या' जन्मतारखेच्या लोकांचे 'अच्छे दिन' सुरू, बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरला मिळणार दिशा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















