(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sagittarius Horoscope Today 28 May 2023 : आज वाणीत गोडवा आणि रागावर नियंत्रण ठेवा; धनु राशीसाठी महत्त्वाचा सल्ला
Sagittarius Horoscope Today 28 May 2023 : धनु राशीचे व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने चांगला जाणार आहे.
Sagittarius Horoscope Today 28 May 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज विद्यार्थ्यांना (Students) यश मिळेल. राजकारणात (Politics) यशासाठी काळ अनुकूल आहे. तुमचा कोणताही जुना वाद संपुष्टात येऊ शकतो. ज्यांना नोकरीची इच्छा आहे त्यांना चांगली संधी मिळेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. वरिष्ठांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. आज कोणालाही वाईट शब्द बोलू नका, नाहीतर अडचणीत अडकू शकता. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करत आहेत, त्यांना खूप फायदा होणार आहे. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. आज कामाच्या ठिकाणी मित्राचं सहकार्य मिळेल.
विचारपूर्वक गुंतवणूक करा
धनु राशीचे व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. आर्थिक बाबींसाठी वेळ अनुकूल असेल. आपण योग्य रितीने, विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास चांगले परिणाम समोर येतील. आज व्यवसायात हळूहळू प्रगती दिसून येईल. नशिबाची साथ मिळाल्याने अडकलेली बहुतांश कामे आज सहज पूर्ण होतील. या राशीचे नोकरदार लोक आज ऑफिसमध्ये व्यस्त राहतील.
आज संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन होईल. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. तुमच्या पालकांशी तुमचे संबंध चांगले असतील आणि तुम्हाला मित्रांचाही पूर्ण पाठिंबा मिळेल. दरम्यान, आज तुमची आर्थिक स्थिती धोक्यात आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आधीच वेळ घ्या.
आज धनु राशीचे आरोग्य
आज तुम्हाला दातांशी संबंधित कोणतीही समस्या जाणवू शकते. यासाठी वेळेवर ब्रश करा. दातांची काळजी घ्या.
धनु राशीसाठी आजचे उपाय
धनु राशीच्या लोकांसाठी आज हनुमान चालिसाचे पठण करणे फायदेशीर ठरेल.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :