Ram Navami 2025 : यंदाची रामनवमी ठरणार भाग्यशाली! 'या' 3 राशींवर असणार प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद; मागाल ती इच्छा होणार पूर्ण
Ram Navami 2025 : यंदाची रामनवमी विशेष खास असणार आहे. कारण या दिवशी पुष्य नक्षत्राचा शुभ योग देखील जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर भगवान रामाची विशेष कृपा असणार आहे.

Ram Navami 2025 : रामनवमीचा उत्सव हिंदू धर्मात हा फार पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा (Ram Navami) उत्सव साजरा करतात. पौराणिक मान्यतेनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीराम यांचा अयोध्येत जन्म झाला. भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त रामनवमी साजरी करतात. यंदा रामनवमी 6 एप्रिल रोजी असणार आहे.
रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची विधीवत पूजा करतात. भगवान रामाची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी आणि शांती टिकून राहते. यंदाची रामनवमी विशेष खास असणार आहे. कारण या दिवशी पुष्य नक्षत्राचा शुभ योग देखील जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर भगवान रामाची विशेष कृपा असणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
रामनवमीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी फार शुभ असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल. तसेच, तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. नोकरदार वर्गातील लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
रामनवमीचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी फार आनंदाचा असणार आहे. या दिवशी तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करु शकता. तसेच, तुमची सर्व संकटांपासून मुक्ती होईल. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण असेल. तसेच, तुम्हाला चांगला धनलाभ होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. नोकरदार वर्गातील लोकांना चांगल्या नोकरीची संधी मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
रामनवमीचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना करिअरच्या चांगल्या संधी मिळतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. या कालावधीत तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. भगवान रामाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे त्यांची मनोभावे पूजा करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















