Raksha Bandhan 2022: चुकूनही भावाला 'अशी' राखी बांधू नका, हे अशुभ मानले जाते
Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना रंगीबेरंगी राख्या बांधतात. सुंदर राखी खरेदी करताना बहिणी अनेकदा काही छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत.
Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतात. भाऊ आपल्या बहिणीला वचन देतो की तो नेहमीच तिचे रक्षण करेल. या दिवशी बहिणी आपल्या भावांना रंगीबेरंगी राख्या बांधतात. सुंदर राखी खरेदी करताना बहिणी अनेकदा काही छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. राखी बांधताना त्याच्या रंगाशी संबंधित काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
'या' प्रकारची राखी खरेदी करू नका
राखी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावर जी राखी बांधत आहात, त्यावर कोणतेही अशुभ चिन्ह नसावे. अशी राखी कधीही खरेदी करू नका, ज्यावर कोणतेही अशुभ चिन्ह असेल. भावाच्या मनगटावर अशी राखी बांधू नका ज्यावर देवी-देवतांचे चित्र असेल. मनगटावर देवतांच्या चित्रांची राखी बांधणे हा देवाचा अपमान मानला जातो.
'ही' राखी अशुभ मानली जाते
राखी बांधण्यापूर्वी, तुमची राखी कोणत्याही प्रकारे तुटलेली नाही ना, याची पूर्ण चाचणी करा. तुम्ही चुकूनही अशी राखी विकत घेतली असेल, तर ती तुमच्या भावाच्या मनगटावर अजिबात बांधू नका. तुटलेली राखी अशुभ मानली जाते.
काळ्या धाग्याची राखी अजिबात बांधू नका
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. भावाला नेहमी पवित्र राखी बांधली जाते, त्यामुळे भावाला काळ्या धाग्याची राखी अजिबात बांधू नका. अशी राखी बांधणे टाळा, ज्यामध्ये काळा धागा वापरला गेला आहे. काळा रंग अशुभ आणि नकारात्मक मानला जातो.
रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त
याविषयी अनेकांचे समज-गैरसमज आहेत. याचं कारण असं की, गुरूवार 11ऑगस्ट रोजी सकाळी 10: 41 पासून श्रावण पौर्णिमा चालू होते. आणि ती शुक्रवारी (ता. 12) रोजी सकाळी 07:08 वाजता संपते. याच दरम्यान सकाळी 10:41 ते रात्री 08:53 भद्रायोग/विष्टी करण आहे. या काळात शुभकार्य केले जात नाही.या संदर्भात पंचवटी नाशिक येथील कुलकर्णी गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लंकापती रावणाला त्याची बहिण शूर्पणखा हिने भद्रा (भद्रा - शनीची बहीण) काळात त्याला राखी बांधली आणि वर्षभरात रावणाचा अंत झाला त्याला बहिणीचे रक्षण करता आले नाही अशा अनेक कथा आहेत. म्हणून मग तस असेल तर आपल काय असा प्रश्न अनेक भगिनींना पडला असेल पण चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे हे पहाणे गरजेचे असते.तो त्यादिवशी चांगला म्हणजे पाताळावर आहे म्हणून दोष नाही.वास्तूशांती, लग्न, मुंजी,या सारखे रक्षाबंधन हे शुभकार्य नसून तो सामाजिक उत्सव असल्याने त्याला वेळ पाहाण्याची गरज नसते म्हणून दिवसभरात आपल्या सोयीने केव्हाही रक्षाबंधन करता येईल. पण त्यातूनच पाहिल्यास, दुपारी 12:31 ते 03:31, 05:00 ते 05:30, सायं.06:31 ते 08:37 या वेळेत करावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
- Raksha Bandhan 2022 Muhurta : उद्या रक्षाबंधन! जाणून घ्या भद्रकालची वेळ, का बांधू नये या काळात राखी?
- Rakshabandhan 2022 : गुजरातमध्ये बनवली देशातील पहिली 'युनिक राखी'; किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क
- Shravan 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?