Rahu ketu Gochar 2025 : राहू-केतूची उलटी चाल, 'या' 4 राशींचे सोन्याचे दिवस सुरु; नोकरी-व्यवसायात मिळेल भरघोस यश
Rahu-ketu Gochar 2025 : राहू ग्रह 18 मे रोजी मीनमधून कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तर, केतू ग्रह याच दिवशी कन्या राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
Rahu-ketu Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रात, राहु-केतूच्या (Rahu) परिवर्तनाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. राहू-केतू (Ketu) ग्रह 2025 मध्ये आपल्या चालीत बदल करणार आहेत. राहू ग्रह 18 मे रोजी मीनमधून कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तर, केतू ग्रह याच दिवशी कन्या राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या राहू-केतूच्या चालीचा 4 राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
यावर्षी होणाऱ्या राहू-केतूच्या संक्रमणाचा मेश राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव होणार आहे. राहू-केतूच्या प्रभावाने या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तुमच्या कुटुंबात सामंजस्य टिकून राहील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती दिसून येईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
राहू-केतू ग्रहाचं संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ प्रभाव टाकणारं आहे. या काळात तुम्हाला नवीन वाहन तसेच,दागिने खरेदी करण्याची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशनची संधी मिळू शकते. तसेच, तुमची धार्मिक कार्यात रुची वाढेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
राहू-केतू ग्रहाचं संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. तसेच, या काळात तुमचे धार्मिक यात्रेला जाण्याचे शुभ योग आहेत. तुमच्या व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळतील. मात्र, या काळात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
राहू-केतू ग्रहाचं संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. या दरम्यान तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच, तुमच्या कुटुंबात शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. राहू-केतू ग्रहाचा शुभ प्रभाव असल्यामुळे तुम्हाला कोणतीच चिंता भासणार नाही. तुमचा मानसिक ताण दूर होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: