Rahu Gochar 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह धन-संपत्तीत होणार वाढ
Rahu Gochar 2024 : राहूने शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे, याचा मकर राशीसह 3 राशींना बंपर फायदा होईल. नेमक्या कोणत्या राशींचं नशीब या काळात पालटणार? जाणून घेऊया.
Rahu Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रात राहूला (Rahu) पापी ग्रह मानण्यात आलं आहे. राहू शुभ कार्यात विघ्न आणि बाधा आणणारा ग्रह आहे. याच कारणामुळे राहू काळात कोणत्या शुभ कार्याची सुरुवात केली जात नाही. परंतु काही राशींसाठी राहूची चाल ही फार शुभ ठरते. जर तुमच्या कुंडलीत राहू चांगला असेल तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, जर तो वाईट असेल तर राजाला देखील कंगाल व्हायला वेळ लागणार नाही.
नुकतच झालेलं राहूचं संक्रमण देखील फार महत्त्वाचं ठरणार आहे. राहूने 8 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 11 मिनिटांनी शनीच्या उत्तराभाद्रपदात प्रवेश केला आहे, जिथे तो सुमारे साडेआठ महिने म्हणजेच, 16 मार्च 2025 पर्यंत राहील. या काळात काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांवर राहूचा शुभ परिणाम राहील. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.
मकर रास (Capricorn)
राहूचं शनीच्या नक्षत्रात संक्रमण केल्याने मकर राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक मानलं जाणार आहे. या राशीच्या लोकांना धनालाभाचे योग जुळून आले आहेत. जर तुमची वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीची योजना असेल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल. अनेक काळापासून ज्या चिंता सतावत होत्या त्या दूर होतील. कुटुंबात सुख-शांती नांदेल.
तूळ रास (Libra)
राहूच्या नक्षत्र बदलाचा तूळ राशीच्या लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे. तूळ राशीची प्रलंबित कामं पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो. या राशीचे लोक राजकारण, पोलीस, सैन्य, क्रीडा इत्यादी क्षेत्रात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून पुढे जातील. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. राहूच्या प्रभावामुळे कोणताही शत्रू तुमच्यासमोर टिकू शकणार नाही. व्यवसायातही तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. कर्जमुक्ती मिळेल.
कुंभ रास (Aquarius)
या राशीच्या लोकांना राहूच्या शुभ स्थितीचा विशेष लाभ मिळू शकतो. सरकारी कामात यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून विशेष लाभ मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबासोबत जवळीक राहील. यासोबतच त्यांच्या सहकार्याने तुम्हाला भरपूर आर्थिक लाभही मिळतील. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथ पुरी मंदिरातील 'ही' 10 रहस्य तुम्हालाही अचंबित करतील