Premanand Maharaj : केस आणि नखं कापण्याचा 'हा' आहे शुभ दिवस; भक्ताच्या प्रश्नाला प्रेमानंद महाराजांनी दिलं स्पष्टच उत्तर
Premanand Maharaj : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये त्यांनी केस, नखं आणि दाढी करण्यासाठी योग्य दिवस कोणता आणि त्याचं महत्त्व काय याबाबत सांगितलं आहे.

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांची ख्याती देशभरात पसरली आहे. वृंदावन येथे स्थित असलेले प्रसिद्ध प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) आपल्या सहज आणि प्रभावशाली प्रवचनासाठी ओळखले जातात. आजच्या तरुण पिढीवर त्यांचा विशेष प्रभाव आहे. त्यांचं प्रवचन फक्त भक्तीपर्यंतच मर्यादित नाही तर जीवनाची दिशा बदलवणारे संकेतही देतात.
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये त्यांनी केस, नखं आणि दाढी करण्यासाठी योग्य दिवस कोणता आणि त्याचं महत्त्व काय याबाबत सांगितलं आहे. प्रेमानंद महाराज म्हणतात की, शौर्य कर्म, म्हणजेच केस विंचरणं, दाढी बनवणं किंवा याच्याशी संबंधित अन्य कार्य आठवड्यातून किमान दोन दिवसच करणं योग्य मानलं जातं. त्यानुसार, जर व्यक्ती हे कार्य कोणत्याही दिवशी करत असेल तर त्या व्यक्तीचं नकळतपणे नुकसान होण्याची शक्यता असते.
'या' दिवशी केस आणि नखं कापू नयेत
प्रेमानंद महाराजांच्या मते, आठवड्यातील प्रत्येक दिवसाच्या मागे काहीना काहीतरी नियम असतो. त्यानुसार, रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानण्यात आला आहे. सूर्य ग्रहाला तेज, ऊर्जा, बुद्धी, आणि प्रतिष्ठेचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे या दिवशी दाढी किंवा केस कापल्याने क्षौर कर्म केल्याने व्यक्तीच्या मानसिक कष्ट आणि आर्थिक स्थितीवर परिणा होऊ शकतो.
प्रेमानंद महाराज म्हणतात की, सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे. या दिवशी शौर्य काम करणं वर्जित मानलं जातं. मान्यतेनुसार, या दिशी केस आणि दाढी कापल्याने भगवान शंकराची कृपा राहत नाही. तसेच, मनात चिंता वाढते.
या व्यतिरिक्त, गुरुवारचा दिवस हा गुरुचा वार आहे. भगवान बृहस्पती ज्ञान, धर्म, संस्कार, प्रतिष्ठेचा कारक ग्रह आहे. या दिवशी शौर्य कार्य केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक शक्ती, भक्ती भाव आणि सामाजिक सन्मानावर नकारात्मक प्रभाव दिसून येतो. या दिवशी गुरुच्या सेवेला अस्थिर करतील असं कोणतंही कार्य करु नये.
प्रेमानंद महाराज पुढे म्हणतात की, मंगळवार आणि शनिवारच्या दिवशीसुद्धा शौर्य कर्म करु नये. हा दिवस भगवान हनुमान आणि शनिदेवाशी संबंधित आहे. परंपरेनुसार, असं म्हटलं जातं की, या दिवशी या दिवशी हे कार्य केल्याने वयात बाधा म्हणजेच जीवनशक्तीवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळेच या दिवशीसुद्धा केस आणि दाढी करु नये.
कोणत्या दिवशी केस आणि दाढी कापणं शुभ?
प्रेमानंद महाराजांच्या म्हणण्यानुसार, बुधवारच्या दिवशी बुध ग्रहाचं प्रतिनिधीत्व असतं. हा ग्रह बुद्धिमत्ता, वाणी, व्यवहार, चातुर्य आणि सौभाग्याचा कारक ग्रह मानतात. या दिवशी केस किंवा दाढी कापल्याने व्यक्तीची मानसिक स्पष्टता वाढते. कार्यक्षमता अधिक मजबूत होते. तसेच, आर्थिक व्यवसात वाढ होते. तसेच, हा दिवस सौंदर्य आणि आकर्षण वाढवणारा देखील मानला जातो.
शुक्रवारचा दिवस हा शुक्र ग्रहाचा असतो. हा ग्रह सौंदर्य, प्रेम, आकर्षण आणि कला विकासाचा कारक ग्रह मानतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही शौर्याचं काम करु शकता.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















