PM Modi Oath : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, शपथविधीचा दिवस का बदलला? ज्योतिषशास्त्रानुसार 9 जूनचा दिवस किती शुभ?
PM Modi Oath : नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा येत्या 9 जूनला पार पडणार आहे.
PM Modi Oath : भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत एनडीएच्या खासदारांनी नेतेपदी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची निवड केली आहे. यामुळे नरेंद्र मोदी (PM Modi) यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळाला आहे. तर, नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा येत्या 9 जूनला पार पडणार आहे.
संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी आता 8 नाही तर 9 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी 8 जून रोजी शपथविधीची तारीख ठरली होती. पण, त्यानंतर आता 9 जून 2024 रोजी संध्याकाळी 07:15 वाजता मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, 9 जून ही तारीख किती शुभ आहे? या दिवशी ग्रहांच्या हालचाली नेमक्या कशा आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 240 जागा जिंकल्या आहेत. मित्रपक्ष तेलगू देशम पक्षाने (टीडीपी) 16, जेडीयू 12, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने 7 आणि चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) 5 जागा जिंकल्या आहेत.
9 जून 2024 चा पंचांग (9 June 2024 Panchang)
दिवस - रविवार
तिथी - तृतीया (दु. 3:46 मिनिटांपर्यंत)
नक्षत्र - पुनर्वसु (रात्री 8 वाजून 21 मिनिटांपर्यंत)
योग - वृ्द्धी योग (संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांपर्यंत)
राहुकाळ - संध्याकाळी 5 वाजून 33 मिनिटांपासून ते 7 वाजून 18 मिनिटांपर्यंत
अभिजीत मुहूर्त - सकाळी 11 वाजून 52 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 48 मिनिटांपर्यंत
दिशा शूल -पश्चिम
9 जून रोजी रविवार आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी दुपारी 3:46 पर्यंत असणार आहे. त्यानंतर चतुर्थीची तिथी सुरू होईल.चतुर्थीच्या तिथीला शपथविधी पार पडणार आहे. या दिवशी वृद्धी योग हा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. या दिवशी पुनवर्सू नक्षत्र रात्री 8.21 वाजता संपेल. त्यानंतर पुष्य नक्षत्र सुरू होईल. या नक्षत्रात शपथ घेतल्यास अधिक शुभ परिणाम मिळू शकतात.
9 क्रमांकाचा नरेंद्र मोदींशी संबंध
अंकशास्त्रानुसार 9 क्रमांकाचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे. नरेंद्र मोदींची कुंडली (PM Modi Kundli) वृश्चिक राशीची (Taurus Horoscope) आहे, ज्याचा स्वामी देखील मंगळ आहे. तसेच, यावेळी हिंदू नववर्षाचा राजाही मंगळ आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: