Shani Dev : पुढचे 268 दिवस 'या' राशी जगतील राजासारखं आयुष्य; शनीच्या संक्रमणामुळे मिळतील जबरदस्त फायदे
Shani Dev : सध्या शनी कुंभ राशीत स्थित आहे. तर, 28 फेब्रुवारीनंतर शनी दुसऱ्या राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे येत्या 268 दिवसांपर्यंत कोणत्या राशींसाठी शनी शुभ असणार आहे ते जाणून घेऊयात.
![Shani Dev : पुढचे 268 दिवस 'या' राशी जगतील राजासारखं आयुष्य; शनीच्या संक्रमणामुळे मिळतील जबरदस्त फायदे Shani Dev saturn rise in aquarius horoscope 268 days will be like a king for these zodiac signs give benefits Shani Dev : पुढचे 268 दिवस 'या' राशी जगतील राजासारखं आयुष्य; शनीच्या संक्रमणामुळे मिळतील जबरदस्त फायदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/d80781cb17215c5ab73a6d30f1626feb1717811843280358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Dev : ज्योतिषशास्त्रात, शनीला न्यायदेवता (Shani Dev) म्हटलं गेलं आहे. शनी प्रत्येकाला (Lord Shani) आपल्या कर्मानुसार फळ देतो. तसेच, इतर ग्रहांच्या तुलनेत शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करायला शनीला तब्बल अडीच वर्ष लागतात. अशातच जर शनीने एखाद्या राशीत परिवर्तन केलं तर त्या व्यक्तीला शनीच्या स्थितीप्रमाणे शुभ, अशुभ परिणाम मिळतात. सध्या शनी कुंभ राशीत स्थित आहे. तर, 28 फेब्रुवारीनंतर शनी दुसऱ्या राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे येत्या 268 दिवसांपर्यंत कोणत्या राशींसाठी (Zodiac Sign) शनी शुभ असणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शनीची ही अवस्था फार लाभदायक आहे. या राशीच्या लोकांच्या अनेक समस्या यामुळे दूर होतील. तसेच, तुमची आर्थिक समस्याही हळूहळू कमी होईल. या काळात तुम्हाला परदेशी जाण्याची संधी देखील मिळू शकते. पण, या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी शनीची उगवती स्थिती शुभ परिणाम देणारी आहे. या राशीच्या लोकांची पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. जे तरूण स्पर्धेची तयरी करतायत त्यांना लवकरच चांगली बातमी मिळेल. तसेच, एखाद्या मित्राच्या मदतीने तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या दूर होतील.
सिंह रास (Leo Horoscope)
शनीची कुंभ राशीत उगवती स्थिती सिंह राशीच्या लोकांसाठी फारच शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून काही कारणास्तव रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला अनपेक्षित धनलाभदेखील मिळेल. तुमच्या आयुष्यात सुख-शांतीचं वातावरण असेल. शनीच्या शुभ परिणामामुळे तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम घडून येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Budh Shukra Asta 2024 : बुध आणि शुक्र ग्रहांचा अस्त; 'या' राशींना मिळतील जबरदस्त लाभ, वेळोवेळी मिळतील शुभसंकेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)