Pitru Paksha 2022 : 'या' राशींसाठी पितृ पक्ष अतिशय शुभ, अचानक आर्थिक लाभ होण्याचा योग
Pitru Paksha 2022 : पितृ पक्षाला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे, ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीच्या लोकांसाठी हा पितृ पक्ष खूप शुभ आहे.
![Pitru Paksha 2022 : 'या' राशींसाठी पितृ पक्ष अतिशय शुभ, अचानक आर्थिक लाभ होण्याचा योग pitru paksha shradh 2022 is lucky for these zodiac signs know positive effect on different zodiac astrology marathi news Pitru Paksha 2022 : 'या' राशींसाठी पितृ पक्ष अतिशय शुभ, अचानक आर्थिक लाभ होण्याचा योग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/77a5bff00219d80729c32ceb5c6ee6bd1663052422420381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pitru Paksha 2022 : हिंदू धर्मात पितृ पक्ष अत्यंत महत्वाचे मानले जाते. पितृ पक्षात पितरांना पिंडदान, तर्पण अर्पण करतात. तसेच त्यांच्या मृत्यूच्या तारखेला श्राद्ध विधी करतात. यामुळे पितर प्रसन्न होतात आणि आप्तेष्टांना आशीर्वाद देतात, हिंदू धर्मात पितृ किंवा श्राद्ध पक्षात गाय, तीळ, जमीन, मीठ आणि तूप इत्यादी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की पितृ पक्षामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे दान केल्याने व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होते. पितृ पक्षाच्या काळात काही गोष्टींचे दान केल्याने होणारे फायदे होतात. पितृ पक्षातील वस्तूंचे दान केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या लोकांसाठी हा पितृ पक्ष खूप शुभ आहे. जाणून घ्या
मेष : या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील, उत्पन्न वाढेल, यासोबतच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचा ताण कमी होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ शुभ राहील. प्रॉपर्टीमध्ये गुंतवलेले पैसे चांगले नफा देईल,
कर्क : या काळात तुमचा प्रवास होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी आनंदाची बातमी असून त्यांच्या विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. जे नोकरी करत आहेत त्यांना कौशल्ये शिकण्याची आणि त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ आहे. जर गुंतवणूक करायची असेल तर दीर्घकालीन गुंतवणूक करणे चांगले आहे,
मिथुन : पितृपक्षाच्या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, तुम्हाला उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा एक शुभ काळ आहे, ज्या दरम्यान तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांकडून प्रेम आणि प्रोत्साहन मिळेल.
कन्या : पितृपक्षात आर्थिक स्थिती सुधारेल, आरोग्य चांगले राहील. तुम्ही अविवाहित असाल आणि लग्नाचा प्रस्ताव शोधत असाल तर हा काळ चांगला आहे.
धनु : पितृपक्षात खरेदी करणे शुभ मानले जात नाही. मात्र या कालावधीत या राशीच्या लोकांचा वाहन किंवा रिअल इस्टेट खरेदी करण्याचा विचार करत आहेत. त्यांच्यासाठी हा काळ शुभ आहे, तुमच्या प्रगतीसाठी किंवा भविष्यात नवीन पदे मिळण्यासाठी हा काळ शुभ आहे. आईच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
कुंभ : पितृपक्षात वैवाहिक जीवन आनंदी आणि शांत असेल. अनपेक्षित संपत्ती आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे, नोकरी बदलण्यासाठी देखील ही चांगली वेळ आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या :
- Pitru Paksha 2022 : उद्यापासून सुरु होतोय पितृपक्ष पंधरवडा; जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व
- Pitru Paksha 2022 : पितृ पक्षात राशीनुसार पितरांचे श्राद्ध करा, वर्षभर घरात राहील समृद्धी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)