Pitru Paksha 2022 : पितृ पक्षात राशीनुसार पितरांचे श्राद्ध करा, वर्षभर घरात राहील समृद्धी
Pitru Paksha 2022 : आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथी रविवार 11 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे 11 सप्टेंबरला पितृ पक्ष सुरू होणार आहे. पण पौर्णिमेचे श्राद्ध हे भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेलाच केले जाते.
![Pitru Paksha 2022 : पितृ पक्षात राशीनुसार पितरांचे श्राद्ध करा, वर्षभर घरात राहील समृद्धी pitru paksha 2022 shradh according to zodiac sings blessings and prosperity will remain in house Pitru Paksha 2022 : पितृ पक्षात राशीनुसार पितरांचे श्राद्ध करा, वर्षभर घरात राहील समृद्धी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/1cddd8b4de840694445203ef330a0f4d1662659538150328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pitru Paksha 2022 : पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथी रविवार 11 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे 11 सप्टेंबरला पितृ पक्ष सुरू होणार आहे. पण पौर्णिमेचे श्राद्ध हे भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेलाच केले जाते. त्यामुळे शनिवार 10 सप्टेंबर रोजी महालया सुरू होणार आहे. पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि दान दिले जाते. असे म्हटले जाते की पितृ पक्षात यमराज जिवंत प्राण्यांना मुक्त करतात आणि त्यांना पृथ्वीवर पाठवतात. जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबियांकडून तर्पण मिळवून समाधानी होतील. अशा स्थितीत पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी राशीनुसार हे काम श्राद्धासोबतच करावे.
मेष : प्रतिपदेच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने गरिबांना अन्नदान करावे.
वृषभ : पितरांच्या नावाने कोणत्याही दिवशी या व्यक्तीने 21 मुलांना अन्न दान करून पांढरे वस्त्र भेट द्यावे.
मिथुन : या राशीच्या लोकांनी पितृ पक्षाच्या कोणत्याही दिवशी पितरांच्या नावाने पक्ष्यांना बाजरी खाऊ घालावी.
कर्क : पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृ पक्षाच्या दिवशी वाहत्या पाण्यात 400 ग्रॅम अख्खे बदाम प्रवाहित करावे.
सिंह : सिंह राशीच्या लोकांनी पितृ पक्षात गरीबांना कोरडे धान्य आणि पिवळे वस्त्र दान करावे.
कन्या : या राशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी गरीब आणि अनाथांना अन्न, वस्त्र इत्यादी दान करावे.
तूळ : पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दूध व तांदळाची खीर दान करावी.
वृश्चिक : या राशीच्या लोकांनी पितरांच्या नावाने 5 गरीब आणि गरजू लोकांना दोन रंगाचे ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करावे.
धनु : या राशीच्या लोकांनी पक्ष्यांना खाऊ घालावे आणि गोशाळेत चारा दान करावा.
मकर : पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृ पक्षात गंगेचे पाणी टाकून स्नान करावे. शनी मंदिरात जाऊन अंध, अपंगांना अन्नदान करा.
कुंभ : पितृदोष निवारणासाठी 11 श्री फळे घेऊन त्यावर पितरांची नावे लिहा आणि ती या वाहत्या पाण्यात प्रवाहित करा.
मीन : गरीबांना दूध किंवा दुधाची खीर खायला द्यावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या
Pitru paksha 2022 : पितृ पक्षात शनि, राहू आणि केतूचे उपाय देतील पितरांचा आशीर्वाद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)