Pitru Paksha 2025 : पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी नवरात्री पूजनाचं सामान खरेदी करावं की करु नये? वाचा ज्योतिषशास्त्राचे नियम
Pitru Paksha 2025 : पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी नवरात्रीच्या पूजेचं सामान खरेदी करावं की करु नये? या संदर्भात शास्त्रात काय नियम सांगितले आहेत ते जाणून घेऊयात.

Pitru Paksha 2025 : हिंदू पंचांगानुसार, आज पितृपक्ष (Pitru Paksha 2025) पंधरवड्याचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपित्री अमावस्येचा (Sarva Pitri Amavasya) दिवस आहे. या काळात पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्राद्ध घातलं जातं. तर्पण केलं जातं. तसेच, दान पुण्याचं काम केलं जातं. आज पितृपक्षाचा शेवटचा दिवस असून उद्यापासूनच शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2025) सुरुवात होतेय. यासाठीच अनेक लोक नवरात्रीची शॉपिंग करण्यासाठी, देवीचं सामान आणण्यासाठी घराबाहेर पडतात. पण, पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी नवरात्रीच्या पूजेचं सामान खरेदी करावं की करु नये? या संदर्भात शास्त्रात नेमके काय नियम सांगितले आहेत ते जाणून घेऊयात.
पितृपक्ष आणि नवरात्रीचा संबंध
पितृपक्षाच्या कालावधीत शुभ कार्य, कार्यक्रम तसेच, नवीन वस्तू खरेदी करण्यास मनाई केली जाते. मान्यतेनुसार, हा काळ फक्त पितरांच्या तृप्तीसाठी आणि त्यांची कृपा मिळवण्याचा असतो. तर, पितृपक्ष समाप्तीच्या दुसऱ्या दिवसापासूनच शारदीय नवरात्रीची सुरुवात होतेय. या काळात देवीची पूजा केली जाते. आणि नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
शारदीय नवरात्री 2025 (Shardiya Navratri 2025)
पंचांगानुसार, यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर 2025 पासून सुरु होतेय. तर, पितृपक्षाचा शेवटचा दिवस 21 सप्टेंबर 2025 रोजी आहे. त्यामुळे नवरात्रीत देवीच्या पूजेसाठी लागणारं साहित्य जसे की, कलश, दिवा, ओढणी, नारळ, गहू, जव, अक्षता तसेच अगरबत्ती यांसारख्या वस्तू खरेदीसाठी 22 सप्टेंबर रोजी सकाळची वेळ फार शुभ राहील.
पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी नवरात्रीचं सामान खरेदी करावं?
धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या सामानाशी संबंधित कोणतंही शुभ कार्य करण्यास, तसेच, पूजेचं साहित्य खरेदी करणं अशुभ मानलं जातं. कारण पितृपक्षाची तिथी फक्त पितरांच्या शांती आणि मोक्ष प्राप्तीसाठी समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी शुभ कार्य तसेच, नवीन वस्तूची खरेदी करणं अशुभ मानलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















