Pitru Paksha 2025: पितृपक्षात 'या' 3 राशींचं नशीब फळफळणार! चंद्रग्रहण-सूर्यग्रहणाचा अद्भूत संयोग, पितरांचा आशीर्वाद अन् श्रीमंतीचे योग..
Pitru Paksha 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, पितृपक्षाच्या 15 दिवसांत 2 ग्रहण होणे खूप खास आहे, त्याचा सर्व लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होईल. त्यामुळे काही लोकांचे भाग्यही फळफळणार आहे.

Pitru Paksha 2025: गणेशोत्सव संपताच पितृपक्ष पंधरवड्याला सुरूवात होतेय. वैदिक पंचांगानुसार, या वर्षी पितृपक्ष एक नाही तर दोन ग्रहणांच्या सावलीत असेल. पितृपक्षाची सुरुवात ही चंद्रग्रहणाने होत आहे आणि ती सूर्यग्रहणाने संपेल. 15 दिवसांत 2 ग्रहण होणे खूप खास आहे आणि त्याचा सर्व लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होईल. परंतु त्यामुळे काही लोकांचे भाग्यही फळफळणार आहे. या लोकांना पितरांचे आशीर्वाद लाभतील...
पितृपक्षाच्या काळात 2 ग्रहण
वैदिक पंचांगानुसार, 2025 मध्ये, पितृपक्ष 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या कालावधीत चालेल. या काळात 2 ग्रहण होतील. 7 सप्टेंबर रोजी पूर्ण चंद्रग्रहण होईल, जे भारतात दिसेल. त्याच वेळी, 21 सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण होईल, जे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी होत आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
15 दिवसांत 2 ग्रहण असणे अशुभ?
ज्योतिषशास्त्रानुसार, एकाच पंधरवड्यात किंवा 15 दिवसांत 2 ग्रहण असणे अशुभ असते. जर दोन्ही ग्रहणे दृश्यमान असतील तर त्यांच्या नकारात्मक परिणामाची शक्यता वाढते.
हे ग्रहण 3 राशींसाठी भाग्यवान!
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा पितृपक्षात होणाऱ्या दोन्ही ग्रहणांचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होईल. परंतु 3 राशींच्या लोकांसाठी हे दोन्ही ग्रहण शुभ ठरू शकतात. चंद्रग्रहण कुंभ राशीत आणि सूर्यग्रहण कन्या राशीत होत आहे.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबरमध्ये 15 दिवसांत सूर्य आणि चंद्रग्रहण होणे वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले राहील. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात यश मिळू शकते. अनपेक्षित पैसे मिळू शकतात. काही मोठे काम पूर्ण झाल्याचा आनंद मिळेल.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी, पितृपक्षाच्या 15 दिवसांत चंद्र आणि सूर्यग्रहण अनुकूल परिणाम देईल. गुंतवणूक करण्यासाठी आणि गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळविण्यासाठी हा काळ शुभ आहे. प्रलंबित पैसे देखील मिळतील. तुम्हाला नवीन नोकरी किंवा जबाबदारी मिळू शकते.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी चंद्र आणि सूर्यग्रहण चांगले परिणाम देऊ शकतात. या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात भरभराट होईल. तुम्हाला नफा होईल. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. जीवनात आनंद आणि समृद्धी वाढेल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: सप्टेंबरचा पहिला आठवडा 'या' राशींसाठी लकी! तुमच्यासाठी कसा जाणार? मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















