व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस, जन्मतारखेनुसार 'रोज डे'ला घाला 'या' रंगाचे कपडे, नात्यातील अडथळे होतील दूर
अंकशास्त्रानुसार व्यवसाय, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. आज तुम्हाला किती लाभाच्या संधी मिळतील? चला जाणून घेऊया, जन्मतारखेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाईल.
![व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस, जन्मतारखेनुसार 'रोज डे'ला घाला 'या' रंगाचे कपडे, नात्यातील अडथळे होतील दूर numerology today 7 february 2024 aajche ankjyotish know your horoscope by date of birth marathi news व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस, जन्मतारखेनुसार 'रोज डे'ला घाला 'या' रंगाचे कपडे, नात्यातील अडथळे होतील दूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/07/bf254f3e28223a4bd66e1c0c93c1e205170727423432389_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Numerology Today 7 February 2024 : न्यूमरॉलॉजी (Numerology) अर्थात अंकशास्त्र काय सांगतं, याची माहिती घेऊ या. त्यामुळे एका वेगळ्या बाजूने त्या संदर्भात विचार करणं शक्य होऊ शकेल.अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. अंकशास्त्रानुसार व्यवसाय, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. आज तुम्हाला किती लाभाच्या संधी मिळतील? चला जाणून घेऊया, जन्मतारखेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाईल.
मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 5 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 5 असेल. परंतु जर तुमचा जन्म 15 किंवा 18 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+5 = 6, 1+8 = 9 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 19 असेल, तर 1+9 = 10, 1+0 = 1 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 1 असेल.
मूलांक 1 - बदललेल्या नोकरीमुळे तुम्हाला आज लाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत खर्च वाढू देऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरगुती बजेटचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करा. कुठेतरी जाण्याचा बेत आखता येईल.
शुभ अंक- 21
शुभ रंग- नारंगी
मूलांक 2 - घरात शुभ असल्याने आनंदाचे वातावरण असेल. आज तुमचे आरोग्य उत्तम असणार आहे. नोकरी करणाऱ्यांना आज कौतुक होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज पूर्ण होतील
शुभ अंक-11
शुभ रंग- पांढरा
मूलांक 3 - व्यावसायात नफा वाढणार आहे. खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका, सर्वांशी आदराने वागा शांत राहण्याचा प्रयत्न करा
शुभ अंक- 19
शुभ रंग- हिरवा
मूलांक 4 - फिरायला जाण्याचा आज योग आहे. दैनंदिन कामातून ब्रेक मिळाल्याने तुम्ही आज आनंदी राहाल. आपली कर्तव्ये पूर्ण करा. कौटुंबिक समस्यांचे निराकरण करा
शुभ अंक-23
शुभ रंग- पिवळा
मूलांक 5 - कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. विचार करूनच निर्णय घ्या कधी कधी थोडे हिशोबी राहणे आवश्यक असते. आज ऐष करण्याची वृत्ती राहिल
शुभ अंक- 9
शुभ रंग- भगवा
मूलांक 6 - मोठे कार्य पेलण्याची तयारी ठेवा. नव्या जगाची ओळख होईल. नौतिक आचरण चांगले ठेवा. संततीचा सहवास लाभेल. मनोबल चागले राहील. कामात यश मिळेल. भावंडांशी वाद टाळा
शुभ अंक-16
शुभ रंग- निळा
मूलांक 7 - हाती घेतलेले काम यशस्वीपणे पूर्ण कराल. चांगल्या घटना घडतील. महत्त्वाची कामे पुझे ढकलणे योग्य राहील. अन्यथा मोठा फटका बसेल. एखादे काम रखडले जाईल
शुभ अंक- 18
शुभ रंग- ग्रे
मूलांक 8 - आज आत्मविश्वासाने काम कराल. भविष्यातील योजना आखण्यासाठी वेळम मिळेल. झटपट कामे पूर्ण करण्याकडे कल असेल. झटपट काम करण्याच्या नादात चूक कराल त्यामुळे अतिघाई नको
शुभ अंक-6
शुभ रंग- लाल
मूलांक 9 - नोकरीत अनुकूल वातावरण राहील, तुमच्य कामाची प्रशंसा होईल. जुन्या मित्र मैत्रिणींच्या भेटी होतील.खर्चावर नियंत्रण ठेवा. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल, गर्दीच्या ठिकाणी जपून राहा. व्यवसायात भरभराट होईल
शुभ अंक-29
शुभ रंग- गुलाबी
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)